23 October 2020

News Flash

माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू

लोकार्पण सोहळय़ाविना पूल खुला करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

image credit : MMRDA twitter

लोकार्पण सोहळय़ाविना पूल खुला करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

ठाणे : भिवंडीतील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूच्या मार्गिकेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सोमवारी सकाळी रद्द करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर रात्रीपासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन्ही दिशेने उड्डाणपूल उभारणीचे काम गेल्या काही वर्षांपासून हाती घेतले आहे. या पुलावरील नाशिक दिशेच्या म्हणजेच उजव्या बाजूच्या चार मार्गिका दोन वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. या पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. डाव्या बाजूच्या चार मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून ही मार्गिका ठाण्याच्या दिशेने जाते. या मार्गिकेचे सोमवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ई-लोकार्पण होणार होते. या कार्यक्रमाची तयारीही पूर्ण झाली होती. सोमवारी रात्री भिवंडीत इमारत दुर्घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाचा ई-लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे काम पूर्ण होऊनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या या पुलावरून वाहतूक सुरू होण्यास आणखी काही दिवस नागरिकांना वाट पाहावी लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. असे असतानाच लोकार्पणाची औपचारिकता टाळून या पुलाची मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी एमएमआरडीएला दिले.

केवळ अधिकृत लोकार्पण झाले नाही म्हणून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवणे आणि वाहनधारकांची गैरसोय करणे बरोबर नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या आदेशानंतर एमएमआरडीएने रात्री १० वाजता या पुलाची मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली असून यामुळे वाहनांचा प्रवास आता सुसाट झाला आहे.

वाहतूक कोंडी सुटण्यास मदत

भिवंडीत मोठय़ा प्रमाणात गोदामे आहेत. त्या ठिकाणी येणारी वाहने मुंबई-नाशिक महामार्गाद्वारे वाहतूक करतात. या मार्गावरून दररोज जड आणि हलकी अशी सुमारे ५० हजार वाहने वाहतूक करतात. मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली चौकामध्ये भिवंडी शहरातून रस्ता जातो. त्यामुळे नाक्यावर वाहतूक रोखून भिवंडी आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सोडण्यात येते. त्यामुळे भिवंडीसह मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक खोळंबून कोंडी होते.उड्डाणपुलाच्या  मार्गिका वाहतुकीसाठी सुरू झाल्याने येथील कोंडी आणखी कमी होणार आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

माणकोली उड्डाणपुलामुळे परिसरात होणारी वाहतूक कोंडी नक्कीच सुटण्यास मदत होणार आहे.

– अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 2:37 am

Web Title: traffic resumes on mankoli flyover zws 70
Next Stories
1 ठाणे महापालिकेच्या शाळा बंदच
2 वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर
3 विकासकावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
Just Now!
X