‘लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

एकांकिकेच्या सादरीकरणाचा दिवस निश्चित होताच, तिच्या तयारीची उलटगणती सुरू होते. तालमीची जागा ठरते आणि मग दररोज त्याठिकाणी सरावाची गंमतजंमत सुरू होते. काही वेळा तर अगदी जागेची झाडलोट करून सुरुवात करावी लागते. पण हळूहळू सर्व कलाकार या जागेच्या इतक्या प्रेमात पडतात की, तालमीची जागा हे त्यांना आपले दुसरे घर वाटू लागते. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागीय प्राथमिक फेरीत सहभागी झालेले विद्यार्थी सध्या याच अनुभवातून जात आहेत.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत

तालीम करताना त्या जागेत सकारात्मक ऊर्जा आणणे, सर्व वस्तूंची जमवाजमव करून त्याच जागेत त्या वस्तू ठेवण्याची व्यवस्था करणे, ती जागा दररोज झाडून स्वच्छ करणे या पद्धतीने त्या जागेची काळजीही घेतली जाते. तालमीच्या जागेत प्रवेश केल्यानंतर ती जागाच रंगभूमी होऊन जाते. ही तालमीची जागा कलाकारांवर आईसारखीच माया करत असल्याचे विद्यार्थी सांगतात. लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेसाठी सज्ज झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे तालमींसाठी वापरत असलेल्या जागेबाबत असलेले कलाकारांचे ‘भावनिक बंध’ त्यांनी व्यक्त केले.

सुरुवातीच्या काळात महाविद्यालयाला एकांकिकेची ओळख नव्हती, त्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सारखे बस्तान बसवावे लागत होते. मात्र त्यानंतर अनेक एकांकिका जिंकल्यानंतर महाविद्यालयाने एक हक्काची जागा दिली. त्यामुळे ही जागा म्हणजे आमच्या नाटकाच्या विद्यार्थ्यांसाठी घरच झाले आहे. महाविद्यालयाच्या शेवटच्या मजल्यावर दिवसाचे जवळपास ८ ते १० तास आम्ही येथे तालीम करतो. कलाकार, तंत्रज्ञ आणि पदडय़ामागील कलाकारांचे हसणे, रडणे, चर्चा, वादविवाद, भांडण या सगळ्याच गोष्टींचे हे माजघर साक्षीदार आहे, असे डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा ओंकार कदम सांगतो.

धुळीने माखलेल्या भिंतींना उजाळा

‘साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वी उरणमध्ये नाटकाला सुरुवात झाली तेव्हा समूह छोटा होता. त्या वेळी आम्ही एका छोटय़ा वर्गात तालीम करायचो. त्यानंतर समूह वाढत गेला आणि जागेची अडचण निर्माण झाली. मग आमच्यातल्या काही मुलांनी उरणच्या मासळी बाजारालगत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह शोधले,’ असे कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाच्या एकांकिकेचा दिग्दर्शक गौरव रेळेकर सांगतो. अनेक दिवस बंद असलेल्या या सभागृहाची या विद्यार्थ्यांनीच साफसफाई केली. तात्पुरती स्वच्छतागृहेही बांधली. सभागृहाच्या इमारतीमधील भिंती आता नाटकाच्या संवादांनी रंगल्या आहेत. त्यामुळे कितीही दमलेलो असलो तरी या जागेत आल्यावर नव्याने ऊर्जा मिळते, असे गौरवने सांगितले.

महाविद्यालयाची गच्ची हक्काची

एकांकिकेची तालीम ही खूप वेळ सुरू असते. त्यामुळे तालमीशी आणि तालमीच्या जागेशी एक वेगळेच नाते असल्याचे कल्याणच्या के. एम. अग्रवाल महाविद्यालयाचा राज धनगर सांगतो. लोकांकिका करण्याचे आणि महाविद्यालयाकडून एकांकिका करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. आजवर महाविद्यालयाकडे एकांकिकेसाठी हक्काची जागा नव्हती, ‘प्राचार्याकडे तालमीच्या जागेसाठी तगादा लावला. त्याला यश मिळाले आणि तालमीसाठी आम्हाला महाविद्यालयाची गच्ची मिळाली. हक्काची जागा मिळाल्याने तिची साफसफाई करण्यापासून तेथे आवराआवर करण्यापर्यंत सर्व कामे विद्यार्थी आवडीने करतात,’ असे राजने सांगितले.

तरीही तालीम सुरूच..

वाशीच्या मॉडेल महाविद्यालयातील एकांकिकेच्या चमूला कधी पहिला मजला तर कधी महाविद्यालयाचे सभागृह, तर कधी व्यायामशाळा अशी ठिकाणे बदलून तालीम करावी लागली. प्रत्येक वेळी नवीन जागेत वस्तूंची मांडणी करणे, मंचाची आखणी करणे यात मुलांचा वेळ खर्च होतो. पण तरीही सर्वानी हे सर्व करून कसून सराव केला, असे या महाविद्यालयातील निखिल खाडे याने सांगितले.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.