18 September 2020

News Flash

वसईतील ४ खासगी रुग्णालयांमध्ये योजना सुरू

महात्मा फुले योजनेअंतर्गत करोनावर विनामूल्य उपचार

प्रतिनिधिक छायाचित्र

महात्मा फुले योजनेअंतर्गत करोनावर विनामूल्य उपचार

वसई : महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आता वसईतील चार खासगी रुग्णालयात करोनावर विनामूल्य उपचार करण्याची सोय उपलब्ध झाली आहेत. ही योजना सर्वांसांठी खुली करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार मिळावे यासाठी  शासनाने ही योजना सुरू केली. पूर्वी केवळ केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांना लाभ मिळत होता. आता सर्वासाठी योजना खुली आहे.  योजनेअंतर्गत १ हजार २०० आजार कव्हर केले जातात.   वसई-विरार शहरातील ९ खासगी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्यातील ४ रुग्णालयात या योजनेअंतर्गत करोनावर उपचार होतील. वसईतील गोल्डन पार्क आणि जनसेवा रुग्णालयात करोनारुग्णांवर महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार सुरू झाले आहेत. तर नालासोपारामधील स्टार आणि गॅलेक्सी या दोन रुग्णालयांतही लवकरच या योजनेअंतर्गत करोनावर उपचार केले जातील, अशी माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या पालघर जिल्हा समन्वयक डॉ. दीपिका झा यांनी दिली. जर रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिला तर नागरिकांनी १५५३८८ या टोल फ्री हेल्पलाइनवर तक्रार करावी असे त्यांनी सांगितले.

कुणाला लाभ मिळणार?

ज्यांना श्वसनाचा त्रास आहे किंवा तब्येत खालावली आहे अशा रुग्णांनाच या योजनेअंतर्गत उपचार मिळतील. सौम्य लक्षणे असलेल्यांना अलगीकरणात उपचार केले जातात.

कसा लाभ मिळवावा?

ज्या खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजनेअंतर्गत करोनावर उपचार होतात, त्या रुग्णालयात आपली शिधापत्रिका (रेशनकार्ड), कोव्हिडचा अहवाल आणि आधार कार्ड दाखवावे. जर शिधापत्रिका नसेल तर आपल्या परिसरातील तलाठय़ाचे पत्रदेखील चालू शकणार आहे.

महात्मा फुले योजनेअंतर्गत करोनावर उपचार करणारी खासगी रुग्णालये

* गोल्डन पार्क रुग्णालय, वसई ( ९१५२५९८२५१, ९७६३८४७६०९)

* जनसेवा रुग्णालय, पापडी, वसई ( ९१७२२१८१२३ ९१७२२१८१२४)

या दोन रुग्णालयात सुरू होणार

१) स्टार रुग्णालय, नालासोपारा ( ९८९२५२७०३९)

२) गॅलेक्सी रुग्णालय नालासोपारा ( ८६९३८७६११७)

महात्मा फुले योजना आता सर्वासाठी खुली आहे. नागरिकांना नमूद केलेल्या खाजगी रुग्णालयात या योजनेअंतर्गत करोनावर उपचार करून घेता येतील.

डॉ. दीपिका झा, समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 3:43 am

Web Title: treatment on corona under mahatma jyotiba phule jan arogya yojana in 4 private hospitals in vasai zws 70
Next Stories
1 पावसाळ्यात शेतकऱ्यांना सर्पदंशाचा धोका
2 मीरा-भाईंदर मध्ये रुग्णवाहिकेची कमतरता
3 ठाणे जिल्हा कुलूपबंद!
Just Now!
X