नौपाडय़ातील एमटीएनएल कार्यालय परिसरातील रस्ता, गोखले रोड, घंटाळी देवी परिसर, चरईतील गणेश टॉकीज परिसर, गडकरी रंगायतन, हिरानंदानी मेडोज परिसर, मुंबई-नाशिक महामार्गालगतचे सेवा रस्ते, कळवा, मनीषानगरमधील हनुमान टेकडी, खारेगाव मच्छी मार्केट परिसर, एलबीएस मार्गावरील टिपटॉप प्लाझाजवळील रस्ता, तीन हात नाका येथील हायवे दर्शन इमारतीजवळील परिसर, कोपरी परिसर आदी भागांत वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडत आहेत.
ठाणे स्थानक परिसरात कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र स्थानकात वाहनतळाची पुरेशी सोय नसल्यामुळे अनेक जण नौपाडय़ातील गोखले मार्ग, एमटीएनएल कार्यालय परिसरातील रस्ता, संभाजी पथ, राम मारुती रोड आदी भागांत वाहने उभी करतात. मात्र या भागात जुने वृक्ष असल्याने येथे वाहन पार्किंगचा धोका अधिक संभवतो.