हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सच्चान यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी शहरात अभिवादन रॅली काढण्यात आली. सकाळी ९ वाजता कॅप्टन सच्चान स्मारकावर पुष्पांजली वाहण्यात आली. ओमकार इंग्लिश स्कूल, शिवाई बालक मंदिर, सेंट जॉन हायस्कूलच्या एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी त्यांना सलामी दिली. त्यानंतर सच्चान यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दिव्यज्योत प्रज्वलित करून रॅलीची सुरुवात झाली.
रॅली मॉडेल कॉलेजमार्गे घरडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्फूर्तिस्थळाजवळ आली. येथील हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून सच्चान यांना आदरांजली वाहण्यात आली. या रॅलीत ओमकार इंग्लिश स्कूल, शिवाई बालक मंदिर स्कूल, सेंट जॉन हायस्कूल, ज्ञानमंदिर विद्यासंकुल, सिद्धार्थ कॉलेज मुंबई, जिल्हा परिषद शाळा सोनारपाडा, महाराष्ट्र कामगार संघटना, ग्राहक संरक्षण मंच, ग्रामपंचायत सदस्य आजदे, सोनारपाडा, मराठवाडा विदर्भ रहिवासी संघ यांसह परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
खासदार श्रीकांत शिंदे, सदानंद थरवळ, भाऊ चौधरी, उपमहापौर राहुल दामले, उपायुक्त सुरेश पवार, राजाबेटा आणि सुधा सच्चान, मुकुंद म्हात्रे, प्रकाश तेलगोटे यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. खासदार शिंदे यांनी यावेळी स्फूर्तिस्थळाची पाहणी करून उद्यानाच्या विकासासाठी दहा लाखांचा निधी मंजूर केला.