News Flash

प्रासंगिक : हिरवाईतील साहसी प्रकार

हिवाळ्याची चाहूल लागताच हिवाळी सहलींचे प्लॅन आखले जाऊ लागतात.

हिवाळ्याची चाहूल लागताच हिवाळी सहलींचे प्लॅन आखले जाऊ लागतात. हिवाळ्याच्या थंडीत निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या आप्तेष्ट मंडळी आणि मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाण्याचा आनंद वेगळाच. हा आनंद आपल्याला लुटायचा असेल तर फार लांब जाण्याची गरज नाही. मुंबईपासून जवळ असलेल्या खोपोलीजवळील दुरशेतमधल्या नेचर ट्रेलच्या रिसॉर्टमध्ये आपण हा आनंद घेऊ शकता.

फक्त रिसॉर्ट म्हणून सीमित न राहता या रिसॉर्टने अनेक निसर्गाच्या सान्निध्यात खेळले जाणारे साहसी क्रीडाप्रकार विकसित केले आहेत. रॅपलिंग, झिपलाइन, बर्माब्रिज, टार्झन स्वीइंग, वॉल क्लाइंबिंग, राफ्टिंग, इत्यादी ‘नेचर अ‍ॅडव्हेंचर’ करताना तुम्ही अधिक तरुण होता व स्वत:ला विसरून जाता. त्यातही कुंडलिका नदीमध्ये केला जाणारा राफ्टिंग हा क्रीडाप्रकार विशेष उल्लेखण्याजोगा. पावसात हा साहसी क्रीडाप्रकार करण्याची मजा काही औरच असली तरी हिवाळ्यातही हे करताना तुम्हाला उत्साही आणि प्रफुल्लित वाटेल. नेहमीच्या रहाटगाडग्यातून आलेला शीण काही क्षणांतच पळून जाईल. नदीच्या धावत्या पाण्याशी स्पर्धा करीत बोटी स्वत: वल्व्हत नेताना अंगावर रोमांच उभे राहतात. झिपलाइन या क्रीडाप्रकारात दोरीच्या साहाय्याने सर्रकन खाली उतरताना तुम्हाला तुम्ही पडताय अशीच भीती वाटते; परंतु एकदा तुम्ही खाली उतरलात की काही तरी नवीन केल्याचा आनंद तुम्हाला मिळाल्यावाचून राहत नाही.

हे सर्व साहसी क्रीडाप्रकार करण्याचे धाडस करताना तुम्हाला थोडी भीतीही वाटण्याची शक्यता आहे. पण सर्व खेळात जसे नियम असतात तसे याही क्रीडाप्रकारात आहेत. त्या नियमांचे पालन करून प्रशिक्षकांच्या आज्ञा पाळून तुम्ही हे क्रीडाप्रकार करण्याची गरज आहे, त्याच वेळी तुम्हाला या क्रीडाप्रकारांचा कोणत्याही भीतीविना आनंद मिळू शकतो.

तुम्ही एखाद्या रिसॉर्टला, वॉटर पार्कला किंवा पिकनिक स्पॉटला नेहमीच जात असाल, पण निसर्गाच्या सोबतीने विविध खेळांची मजा लुटत या आगळ्यावेगळ्या स्टर्लिग हॉलिडेच्या नेचर ट्रेल रिसॉर्टला भेट द्यायलाच हवी. इथे तुम्हाला बऱ्याचदा कुटुंबांसोबत तरुणांचा घोळका दिसेल. शालेय विद्यार्थ्यांच्या गटागटाने आलेल्या सहली दिसतील. अगदी सातारा, सांगली, गुजरातवरून कुटुंबासह, मित्रांसह अनेक जण येथे तुमच्या सोबतीला असतील. या सर्वासोबत तुम्ही कॅम्प फायर करू शकता. स्वत:चं जेवण स्वत: शिजवू शकता. यासाठी तुम्हाला तेथील प्रशिक्षकांची मदतही मिळेल. त्यामुळे सगळ्या तणावाला अलविदा करण्याच्या या संधीचा नक्कीच विचार करा.

कसे जाल?

* रस्त्याने- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून १२ किमी अंतरावर हे दुरशेत गाव आहे. मुंबईपासून याचे अंतर ७६ किमी आहे.

* रेल्वेमार्ग- रेल्वेने खोपोलीला उतरूनही दुरशेतला जाता येते. यासाठी रिक्षाने टप्प्याटप्प्याने जावे लागते. खोपोली ते दुरशेत साधारण १७ किमी अंतर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 2:43 am

Web Title: trip to durshet village in khopoli
Next Stories
1 संमेलनात २७ गावांचा ‘प्रयोग’
2 ‘इमानी मित्रां’चा रॅम्पवर रुबाब..
3 शहरबात कल्याण : ‘कौतुकास्पद’ आराखडय़ाचे धक्कादायक विस्मरण
Just Now!
X