नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
शाळेत नोकरी मिळवून देतो, असे सांगून एका शिक्षकाकडून दीड लाख रुपयांची लाच उकळण्यात आली होती. प्रत्यक्षात नोकरी मिळाली नाही, त्यामुळे नैराश्याच्या भरात त्या शिक्षकाने २००५ साली अंबरनाथ येथे आत्महत्या केली होती. याप्रकरणी शिक्षकाच्या आत्महत्येस जबाबदार धरून कल्याण सत्र न्यायालयाने संस्थाचालकास दहा वर्षांची कैद आणि दीड लाखांचा दंड तसेच फसवणुकीप्रकरणी तीन वर्षांची अतिरिक्त शिक्षा ठोठावली आहे.
तब्बल ११ वर्षांपूर्वी अंबरनाथमधील कोहोज गाव येथे सीता माऊ ली ही शाळा सिद्धार्थ कांबळे चालवत होते. अनेक कारणांमुळे ही शाळा वादग्रस्त ठरली होती. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज दहावी बोर्डाकडे न भरता फी लांबविल्याचा गुन्हा शाळेच्या व्यवस्थापनावर दाखल झाला होता. याच शाळेत शिक्षकाची नोकरी देतो म्हणून प्रदीप लोहार यांच्याकडून २००५ साली दीड लाख रुपये घेण्यात आले. प्रत्यक्षात नोकरी न लावता शाळा बंद करू न शाळाचालक सिद्धार्थ कांबळे याने पोबारा केल्याची तक्रारी होती. नोकरीच्या ठिकाणी पैसे भरण्यासाठी घेतलेले कर्ज आणि कर्जाच्या पैशाचे वाढत गेलेले ओझ्यामुळे आलेल्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतून लोहार यांनी विष पिऊ न आत्महत्या केली. याप्रकरणी संस्थाचालक सिद्धार्थ कांबळेविरोधात फसवणुकीचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सिद्धार्थ कांबळेला अटकही करण्यात आली होती. मात्र जामिनावर त्याची तात्काळ सुटका झाली होती. प्रदीप लोहार यांच्या पत्नी आशा लोहार यांनी मात्र न्यायालयीन लढा सुरूच ठेवला. कल्याण सत्र न्यायालयात याप्रकरणी तब्बल ११ निकाल सुनावण्यात आला.