ठाणे शहरातील सर्वात मोठा मॉल म्हणून परिचित असलेल्या विवियाना मॉलमध्ये दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा संदेश व्हॅटस् अॅपवर प्रसारित होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने मॉलमधील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच खासगी टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद करण्यासंबंधी नोटीस पाठविण्याची तयारी सुरू केली असून सोमवारी ही नोटीस मॉल व्यवस्थापनाला पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या वृत्ताचा इन्कार करत मॉलची बदनामी करण्यासाठी अशा स्वरुपाचा संदेश प्रसारित करण्यात येत आहे. यासंबंधी ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार करण्याच्या विचारात असल्याचे मॉल व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
विवियाना मॉलमध्ये खरेदी तसेच सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. सोमवार ते शुक्रवार २० ते २५ हजार आणि शनिवार व रविवारी ४० ते ५० हजार ग्राहक विवियानाला भेट देतात. याशिवाय, शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सेल असेल सुमारे ७० ते ८० हजार ग्राहक मॉलमध्ये हजेरी लावतात. त्याचप्रमाणे या शनिवार आणि रविवारी मॉलमधील सर्वच दुकानांमध्ये भव्य सेल ठेवण्यात आलेला आहे. त्यासंबंधीच्या जाहिरातीही प्रसिद्ध झाल्या होत्या. असे असतानाच शुक्रवारी दुपारी व्हॅटस् अॅपवर एक संदेश प्रसारित झाला आणि तो अनेकांच्या व्हॅटस् अॅप खात्यावर व ग्रुपवर फिरु लागला. त्यात मॉलमध्ये दुषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने अनेक ग्राहकांना उलटय़ा, जुलाब यासारखा त्रास झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे शहरात खळबळ उडाली.
व्हॅटस् अॅपवर प्रसारित झालेल्या संदेशाची महापालिका प्रशानाने गंभीर दखल घेतली आहे. मॉलमध्ये एक इंचाच्या आठ जोडण्या देण्यात आल्या आहेत. तरीही मॉल व्यवस्थापन खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेत आहे. या टँकरमुळेच दुषित पाणी पुरवठा असल्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. तसेच खासगी टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद करण्यासंबंधी नोटीस पाठविण्याची तयारी सुरू केली असून सोमवारी ही नोटीस मॉल व्यवस्थापनाला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी दिली. तसेच अतिरीक्त पाण्यासाठी मॉल व्यवस्थापनाने खासगी टँकरऐवजी महापालिकेच्या टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मॉलच्या बदनामीचा प्रयत्न’
ग्राहकांचा वाढत्या प्रतिसादामुळे या शनिवार आणि रविवारी मॉलमधील सर्वच दुकानांमध्ये सेल लावण्यात आलेला असून त्यासंबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतरच शुक्रवारी दुपारी व्हॅटस् अॅपवर मॉलमध्ये दुषीत पाणी पुरवठा होत असल्याचा संदेश प्रसारित झाला. ग्राहकांनी मॉलमध्ये खरेदीसाठी येऊ नये म्हणूनच मॉलची बदनामी करण्यासाठी अशा स्वरुपाचा संदेश प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे यासंबंधी ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार करण्याचा विचार सुरु आहे, असे मॉलचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील श्रॉफ यांनी सांगितले. तसेच मॉलमध्ये अधिकृत वितरकांमार्फतच पाणी विकत घेण्यात येते. त्यामुळे दुषित पाणी पुरवठा होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ