News Flash

कासवाचा २०व्या मजल्यावरून पडून मृत्यू; गुन्हा दाखल

एका सफाई कामगाराने या कासवाची विल्हेवाट लावली

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : बाळकूम येथे इमारतीच्या २० व्या मजल्यावरून खाली पडून पाळीव कासवाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कासव पाळणाऱ्या व्यक्तीविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा परदेशी प्रजातीचा कासव असल्याची माहिती प्लांट अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे सदस्य सुनीष कुंजू यांनी दिली.

सुनीष कुंजू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बाळकूम परिसरातील हायलॅण्ड हेवनमधील कोरल इमारतीत २० व्या मजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीने कासव पाळले होते. १ मे या दिवशी हे कासव घरातील सज्जातून खाली पडले. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कासव पाळणारी व्यक्ती कासवाला पाहण्यासाठी इमारतीच्या खालीही उतरली नव्हती. एका सफाई कामगाराने या कासवाची विल्हेवाट लावली. या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात कासव पाळणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या व्यक्तीने हे कासव घरात पाळले होते त्याने योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने ते कासव घरातून खाली पडले, असे तक्रारीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 2:47 am

Web Title: turtle dies after falling from 20th floor case filed zws 70
Next Stories
1 अंबरनाथ, बदलापुरात रुग्णसंख्या आटोक्यात
2 अतिरिक्त आयुक्तांच्या पालिका प्रवेशात अडथळे
3 प्रतिजन चाचणी करूनच लसीकरण
Just Now!
X