21 September 2018

News Flash

ट्वीटरमुळे मदत, आजारी मुलीची सुटका

ट्वीट पाहून माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संतोष गीते पाण्यातून त्या इमारतीत गेले.

मुलीला कडेवर घेऊन बाहेर आणले आणि जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

वसई : वसईत पाणी साचल्यामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांचे बचावकार्य सुरू आहे. नियंत्रण कक्ष तसेच हेल्पलाइनवर ज्यांनी मदत मागितली त्यांना मदत करून त्यांची सुटका करण्यात येत आहे. अशाच प्रकारचा मदतीचा ट्वीट पालघर पोलिसांना मिळाला. ट्वीटवरून एका सहा महिन्यांच्या आजारी चिमुकलीला पालघर पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले.

HOT DEALS
  • Panasonic Eluga A3 Pro 32 GB (Grey)
    ₹ 9799 MRP ₹ 12990 -25%
    ₹490 Cashback
  • Coolpad Cool C1 C103 64 GB (Gold)
    ₹ 11290 MRP ₹ 15999 -29%
    ₹1129 Cashback

आपत्कालीन परिस्थितीत विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची अग्निशमन दल, पोलीस तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकामार्फत सुटका करण्यात येत होती. बुधवारी पालघर पोलिसांच्या ट्विटरवर वसईच्या सनसिटी येथील एका व्यक्तीने ट्वीट करून मदत मागितली. शरद झा हे सनसिटी परिसरातील आयरिश या इमारतीत राहतात.  या इमारतीच्या खाली पाणी साचले असल्याने इमारतीमध्ये रहिवासी अडकून पडले आहेत. शरद झा यांची सहा महिन्यांची मुलगी चेतना आजारी होती आणि तिला रुग्णालयात न्यायचे होते. परंतू इमारतीखाली पाणी साचल्याने अशा परिस्थितीत आजारी मुलीसह बाहेर पडणे त्यांना जोखमीचे वाटत होते. असहाय्य अवस्थेत शेवटी शरद झा यांनी पालघर पोलिसांना ट्वीट करून मदत मागितली.

ट्वीट पाहून माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संतोष गीते पाण्यातून त्या इमारतीत गेले. त्यांनी मुलीला कडेवर घेऊन बाहेर आणले आणि जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मंगळवारी याच परिसरात राहणाऱ्या एका गर्भवती महिलेला वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने बोटीतून सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल होते.

First Published on July 12, 2018 3:09 am

Web Title: twitter help sick girl in vasai