News Flash

ओएलएक्सवर फसवणूक करणारे दोघे अटकेत

ओएलएक्सवर लॅपटॉप विक्रीसाठी जाहिरात केली होती.

ओएलएक्सवर फसवणूक करणारे दोघे अटकेत

ठाणे : ओएलएक्स या वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर विक्रीसाठी असलेला सुमारे अडीच लाख रुपयांचा लॅपटॉप घेऊन फरार झालेल्या दोघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली. पीटर सॅन्चेस (३०) आणि सिद्धेश सावंत (३०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.

घोडबंदर येथे राहणारे प्रकाश हेगडे यांचा मुलगा परदेशात शिक्षण घेण्यासाठी जात असल्याने त्यांनी त्याच्याकडे असलेला नवा कोरा लॅपटॉप २ लाख ३० हजार रुपयांमध्ये विक्रीसाठी काढला होता. त्यासाठी त्यांनी ओएलएक्सवर लॅपटॉप विक्रीसाठी जाहिरात केली होती. हा लॅपटॉप पीटर आणि सिद्धेश यांनी संकेतस्थळावर पाहिल्यानंतर त्यांनी हेगडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पीटर आणि सिद्धेश हे दोघेही लॅपटॉप पाहण्यासाठी ठाण्यात आले. लॅपटॉप पसंत असल्याचे दाखवत त्यांनी २ लाख ३० हजार रुपयांचा धनादेश हेगडे यांना दिला. हा धनादेश वटविण्यासाठी हेगडे यांचा मुलगा दोघांनाही घेऊन बँकेत निघाला. बँकेजवळ आले असता, पीटर आणि सिद्धेश हे लॅपटॉप घेऊन बँकेबाहेर उभे राहिले, तर हेगडे यांचा मुलगा बँकेत गेला. मात्र हा धनादेश बनावट असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हेगडे यांचा मुलगा बँकेबाहेर आले असता पीटर आणि सिद्धेश लॅपटॉप घेऊन फरार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हेगडे यांनी याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाच्या तपासासाठी कासारवडवली पोलिसांनी एक पथक नेमले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास करून मुंबईतील मालवणी येथून पीटर याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत सिद्धेशचीही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सिद्धेशला अंधेरी येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांचा लॅपटॉप, गुन्ह्यात वापरलेले मोबाइल फोन जप्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:39 am

Web Title: two arrested for cheating on olx akp 94
Next Stories
1 यंदाची राष्ट्रीय बालविज्ञान परिषद ऑनलाइन
2 अतिक्रमणांविरोधात आक्रमक
3 थकबाकीधारकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा
Just Now!
X