News Flash

भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

अंबरनाथमधील कल्याण-बदलापूर रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे.

(सांकेतिक छायाचित्र)

कल्याण-बदलापूर रस्त्यावर दोन तर लोकलमधून पडून एक जखमी

अंबरनाथमधील कल्याण-बदलापूर रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी सकाळी याच रस्त्यावर दुचाकीवरून घसरून दोघे जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी सकाळी बदलापूरहून अंबरनाथला लोकलने येणारा एक विद्यार्थी अंबरनाथ स्थानकापूर्वी लोकलमधून पडल्याने जखमी झाला आहे.

अंबरनाथमधील कल्याण बदलापूर रस्त्यावर बुधवारी रात्री उशिरा भरधाव दुचाकीने पुढे चालणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. कल्याण बदलापूर रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ झालेल्या या अपघातात दुचाकीवरून जाणारे सूरज सोनावणे (२८) आणि चेतन वाघे (३६) असे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच सूरज सोनावणे याचा मृत्यू झाला. तर, चेतन वाघे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सूरज हा अंबरनाथ तर विजय वाघे हा बदलापूर येथील रहिवासी होता. त्याच दिवशी सकाळीच अंबरनाथ येथील मटका चौक परिसरातून दोन तरुण दुचाकीवर जात असताना रस्त्यावरील पसरलेल्या खडीवर घसरून त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दोघे तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील एका तरुणाला पुढील उपचारासाठी डोंबिवली येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.तर सकाळी बदलापूरहून येणाऱ्या लोकलमधून पडून एक विद्यार्थी जखमी झाला आहे.  मध्यवर्ती रुग्णालयात  उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 1:41 am

Web Title: two killed in heavy accident akp 94
Next Stories
1 भाजपच्या खेळीपुढे काँग्रेस चीत!
2 ‘लोकांकिका’च्या ठाणे विभागीय फेरीचे वेध
3 आई आली, पण पिलाला न घेताच गेली!
Just Now!
X