05 June 2020

News Flash

coronavirus : ठाण्यात दोन जण करोनामुक्त

कासारवडवली भागातील रुग्ण फ्रान्स येथून आल्यानंतर त्याच्यात करोनासदृश लक्षणे आढळली होती.

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन रुग्णसंख्या २६ इतकी झाली असतानाच, त्यापैकी दोन रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना नुकतेच घरी सोडण्यात आले आहे. शहरात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मात्र, दोन रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतल्यामुळे ठाणे शहरासाठी हे दिलासादायक वृत्त आहे.

शहरातील दोन करोनाबाधित रुग्ण आता पूर्णपणे बरे झाले आहेत. या दोन्ही रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये कासारवडवली आणि वर्तकनगर भागातील रुग्णांचा समावेश आहे.

कासारवडवली भागातील रुग्ण फ्रान्स येथून आल्यानंतर त्याच्यात करोनासदृश लक्षणे आढळली होती. त्यामुळे १२ मार्च रोजी त्याला कस्तुरबा गांधी रुग्णालयात चाचणीसाठी नेण्यात आले होते. तिथे चाचणीत त्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ठाणे शहरातील हा पहिला रुग्ण होता. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. १४ दिवसांनंतर केलेल्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याने त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर वर्तकनगर भागातील एका गृहसंकुलातील एक रहिवासी लंडनवरून आल्यानंतर २७ मार्चला तो फोर्टिज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. ३० मार्चला त्याला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर केलेल्या चाचणीत त्याचा अहवाल नकारात्मक आल्याने त्याला ७ एप्रिलला घरी सोडण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 1:55 am

Web Title: two persons recover of coronavirus in thane zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 टाळेबंदीच्या काळात २४ लाखांचा मद्यसाठा जप्त
2 ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क राहा
3 टाळेबंदीतील उल्लंघनामुळे भाजीपाला बांधावरच
Just Now!
X