15 October 2019

News Flash

पालघरमधील अपघातात २ ठार

चहाडे सज्जनपाडा येथे राहणारे जयेश भिलाडे आणि किशोर भोईर हे दोघे त्या दुचाकीवरुन जात होते.

प्रतिकात्मक छायाचित्र

पालघरमधील मनोर रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात झाला असून अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. जयेश भिलाडे आणि किशोर भोईर अशी या मृतांची नावे आहेत.

पालघर तालुक्यातील वाघोबा खिंड परिसरात अज्ञात वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. चहाडे सज्जनपाडा येथे राहणारे जयेश भिलाडे आणि किशोर भोईर हे दोघे त्या दुचाकीवरुन जात होते. या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

First Published on January 12, 2019 9:23 am

Web Title: two youth died in bike accident in palghar