News Flash

निवडणुकीआधी साबरमती, आता बारामती- उद्धव ठाकरे

कल्याण-डोंबिवलीचेही बारामती करायचे आहे का, ते तुम्ही ठरवा, असे उद्धव यांनी यावेळी मतदारांना सांगितले

कल्याण-डोंबिवलची स्मार्ट सिटी करण्याची घोषणा करणाऱ्यांनी सर्वप्रथम नेमके काय करणार हे सांगावे

प्रचारावेळी साबरमती आणि निवडून दिल्यानंतर बारामती, अशी भूमिका काहीजणांनी घेतल्याचे सांगत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना टोला लगावला. ते मंगळवारी डोंबिवली येथील प्रचारसभेत बोलत होते. निवडणुकीच्या प्रचारात साबरमतीचा उल्लेख असणाऱ्यांच्या तोंडी हल्ली बारामतीचाच उल्लेख असतो. या लोकांना देशात १०० बारामाती उभारायच्या आहेत. कल्याण-डोंबिवलीचेही बारामती करायचे आहे का, ते तुम्ही ठरवा, असे उद्धव यांनी यावेळी मतदारांना सांगितले. कल्याण-डोंबिवलीत आम्ही कामं करून मते मागत आहोत, असा दावाही उद्धव यांनी यावेळी केला. कल्याण-डोंबिवलची स्मार्ट सिटी करण्याची घोषणा करणाऱ्यांनी सर्वप्रथम काय करणार हे सांगावे. शिवसेना सध्या जे काही करतेय त्यापेक्षा तुम्ही वेगळे असे काय करणार, असा सवाल उद्धव यांनी भाजपला विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2015 8:56 pm

Web Title: uddhav thackeray slam bjp in kdmc election rally
Next Stories
1 जाहीरनाम्यांच्या पत्रावळी
2 कर्मयोग हाच भगवद्गीतेचा मूलमंत्र
3 भाजपच्या स्मार्ट सिटीपासून सेना दूरच!
Just Now!
X