News Flash

जलपर्णी काढण्यात कडोंमपा हतबल

नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी छोटे बंधारे बांधण्यात आले असून त्यातून मोठय़ा प्रमाणात गळती होत आहे.

माजी नगरसेवकाचा उल्हास नदीपात्रात बसून ठिय्या; आंदोलनावर अद्याप तोडगा नाही

ठाणे जिल्ह्य़ातील महत्वाच्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीमध्ये वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्याची पातळी खालवत असून ती पूर्णपणे काढेपर्यंत नदीपात्रामध्ये ठिय्या मांडण्याचा प्रताप कल्याणच्या माजी नगरसेवकाने केला आहे. माजी नगरसेवक असलेल्या नितीन निकम यांनी दोन मार्चपासून सलग नदीपात्रामध्य बसून ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. संपूर्ण नदीपात्रातील जलपर्णी नष्ट करा, नदीवरील छोटय़ा धरणांची गळती थांबवा आणि शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करा, या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यास महापालिका प्रशासन आणि आता पाटबंधारे विभागही हतबल झाल्याचा सूर या निमित्ताने लावला जात आहे.

जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीची पुरती दुरवस्था झाली असून नदीपात्रामध्ये खारफुटीचे साम्राज्य पसरले आहे. नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी छोटे बंधारे बांधण्यात आले असून त्यातून मोठय़ा प्रमाणात गळती होत आहे. शेकडो दशलक्ष लिटर पाणी यामुळे वाया जात आहे, तर अनेक कंपन्यांचे पाणी थेट उल्हास नदीमध्ये येते. उल्हास नदीच्या पात्रात मोहीली येथे स्टेम आणि कल्याण-डोंबिवली शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या परिसरात नदी पात्रामध्ये मोठय़ा प्रमाणात खारफुटीचे साम्राज्य पसरले आहे. याविरोधात माजी नगरसेवक असलेल्या नितीन निकम यांनी नदीपात्रामध्ये ठिय्या आंदोलन पुकारले. नदीपात्रामध्ये बसून त्यांनी या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. खारफुटी वनस्पती संपूर्णपणे काढून टाकावी तसेच पाणी साठवणुकीची छोटी धरणे दुरुस्त करण्यात यावेत, अशा मागण्या असून त्या पूर्ण झाल्याशिवाय हटणार नसल्याचा दावा निकम यांनी केला आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांनी आंदोलक निकम यांची भेट घेतली असली तरी अद्याप या आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2016 2:18 am

Web Title: ulhas river issue
टॅग : Thane
Next Stories
1 गुन्हे वृत्त : चार लाखांची फसवणूक
2 भाकरीची फॅक्टरी..
3 औचित्य महिला दिनाचे..
Just Now!
X