02 March 2021

News Flash

उल्हासनगर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव

शिवसेना आणि रिपाइंने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला होता.

उल्हासनगर महापालिका

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि पप्पू कलानी पुत्र ओमी यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला असून प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निसटता विजय मिळवला आहे. या पराभवामुळे उल्हासनगरात कलानी-चव्हाण युतीला  हादरा आहे. उल्हासनगर महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी दीड वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपने ओमी कलानी यांची साथ धरली. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ ब मधील नगरसेविका पूजा कौर लबाना यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने या ठिकाणी ६ एप्रिल रोजी पोटनिडणूक घेण्यात आली होती. हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेसचा एके काळचा बालेकिल्ला मानला जातो.  या ठिकाणी भाजपच्या तिकिटावर ओमी कलानी गटाच्या साक्षी पमनानी यांनी अर्ज दाखल केला होता. शिवसेना आणि रिपाइंने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीने आपला गड राखण्यात यश मिळवले असून भाजपला धक्का बसला आहे. अवघ्या २०३ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन सचदेव यांचा विजय झाला. या विजयामुळे महापालिकेतील सत्तासमीकरणांवर काहीच परिणाम होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 4:08 am

Web Title: ulhasnagar municipal corporation by election 2018 bjp defeats in ulhasnagar by election
Next Stories
1 ठाण्यात जयस्वाल यांच्या वाढदिवसाचा उत्सवी थाट
2 नालासोपाऱ्यात दिवसाढवळया एका व्यक्तिची धारदार शस्त्राने वार करुन हत्या
3 शिवसेनेत दुफळी
Just Now!
X