11 August 2020

News Flash

मुंब्रादेवी डोंगरावर अनधिकृत बांधकामांना उधाण

टाळेबंदीचा फायदा घेत अनधिकृत झोपडय़ांची सर्रास विक्री

टाळेबंदीचा फायदा घेत अनधिकृत झोपडय़ांची सर्रास विक्री

ठाणे : शहरात करोना विषाणूू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा गैरफायदा घेत काही भूमाफियांनी मुंब्रादेवी डोंगरावर अनधिकृत झोपडय़ा उभारण्यास सुरुवात केली आहे. मुंब्रा ब’ावळण मार्गाला लागून उभारल्या जात असलेल्या या झोपडय़ांची ७० ते ८० हजार रुपयांमध्ये विक्री केली जात आहे. एकीकडे पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेकडून डोंगर उतारावरील झोपडय़ा रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले असतानाच दुसरीकडे मात्र डोंगरावर अशा झोपडय़ा उभ्या राहत असल्याचे चित्र आहे. त्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

मुंब्रा डोंगर भागात असलेल्या मार्गालगत गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. या मार्गाच्या पायथ्याशी असलेल्या झोपडय़ांवर कंटेनर उलटून अपघात झाल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. तसेच या मार्गाच्या पायथ्याशी आता बांधकामांना पुरेशी जागा शिल्लक राहिली नसल्याने भूमाफियांनी डोंगराच्या माथ्यावर झोपडय़ा उभारल्या आहेत. गेल्या काही वर्षांत ही बांधकामे उभी राहिली असून या ठिकाणी नागरिकही वास्तव्यास आले आहेत. याच भागातील मोकळ्या जागांवर आता भूमाफियांनी अतिक्रमण करत झोपडय़ा उभारण्याचे काम सुरू केले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी शिथिल करण्यात आली आहे. मात्र, राज्य शासन, व महापालिका प्रशासनाकडून करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर प्रशासनाला पावसळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम करावे लागत आहे. या कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यग्र आहेत. या सर्वाचा फायदा घेऊन भूमाफियांनी झोपडय़ा उभारणीची कामे सुरू केल्याचे चित्र आहे.

टाळेबंदीच्या काळात  अनधिकृत बांधकामांवर वनविभागाच्या वतीने सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. तर मुंब्रा आणि कळवा परिसरात वन विभागाचे पथक विशेष लक्ष ठेवून आहे. त्यामुळे मुंब्रा देवी डोंगरावर झोपडय़ा उभारण्याची कामे सुरू असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.

– डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 4:04 am

Web Title: unauthorized construction in mumbra devi hill zws 70
Next Stories
1 इथे पाणीटंचाई आहे, घरे घेताना काळजी घ्या!
2 दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सामाजिक संस्थांचा आधार
3 प्रभाग दौऱ्यात पालिका आयुक्तांचा करोनामुक्त नागरिकांशीही संवाद
Just Now!
X