News Flash

पेट्रोल चोरीच्या रॅकेटमधील मुख्य आरोपीला अटक

ठाणे पोलिसांची कारवाई

प्रकाश नुलकर

पेट्रोल पंपावर मायक्रो चिप्स (डिव्हाईस) लावून पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला ठाणे पोलिसांनी अटक केली. प्रकाश नुलकर (वय ५६, रा. लोअर परेल) असे आरोपीचे नाव असून, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने हुबळी येथून त्याला अटक केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हा मिडको पेट्रोल पंप मशीन तयार करणाऱ्या कंपनीत कार्यरत होता. या कंपनीतून काम सोडल्यानंतर तो पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरीत सक्रिय झाला. पेट्रोल पंपावर मायक्रो चिप्स बसवण्याच्या कामासाठी तो ५० हजार पासून १ लाख ५० इतकी रक्कम घेत होता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पंपावर मायक्रो चिप्स (डिव्हाईस) लावून पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांचे पेट्रोल चोरी करत असल्याची घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली होती. सदर प्रकरणी उत्तर प्रदेशातून फरारी असलेल्या विवेक शेट्टे (वय ४७, रा. लोढा हेवन, चंद्रेश व्हिला कॉ. ऑप. सोसायटी निळजे डोंबवली ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण पथक आणि एसटीएफ यांनी डोंबवली येथून अटक केली होती. तर या चिप्सचे (डिव्हाईस) संचालन करण्यासाठी रिमोट तयार करणाऱ्या अविनाश नाईक याला पुण्यातून अटक करण्यात आली होती. या दोघां आरोपींकडून ११० माइक्रोचिप्स आणि १७७ रिमोटसह ऑसिक्लोस्कोप आणि प्रोग्रामर हस्तगत करण्यात आले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 12:38 pm

Web Title: up petrol station scam thane police arrested main accused in hubali
Next Stories
1 निवडणुकीच्या तोंडावर योजनांचा पाऊस
2 ‘इंटरनेट कॉल’द्वारे तरुणींची छळवणूक
3 पोलिसांच्या जागेवरही भूमाफियांचा डल्ला
Just Now!
X