07 July 2020

News Flash

अमेरिकेतील कलादालनात ठाण्यातील चित्रे

त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन गेली दोन वर्षे त्या पूर्णवेळ चित्रकार म्हणून कार्यरत आहेत.

जाणकार रसिकांपर्यंत आपली कलाकृती पोहोचावी, यासाठी प्रत्येक कलावंत एखाद्या उत्तम कलादालनात प्रदर्शन भरविण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतो. माहिती आणि तंत्रज्ञान युगातील प्रगतीमुळे जगात कुठेही प्रदर्शन भरविण्याची संधी त्यांना उपलब्ध होऊ शकते. ठाण्यातील चित्रकार कांचन घारपुरे यांनी नुकताच तो अनुभव घेतला. सध्या त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना भागातील कॅरी शहरातील बॉन्ड पार्क कम्युनिटी सेंटर या कलादालनात भरले असून ३१ ऑक्टोबपर्यंत ते रसिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

मुंबईतील जे.जे. कला महाविद्यालयातून फाइन आर्टचे पदवी शिक्षण घेतलेल्या कांचन घारपुरे दहा वर्षे ठाणे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन गेली दोन वर्षे त्या पूर्णवेळ चित्रकार म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी-२०१४ मध्ये जहांगिर कलादालनातील समूह प्रदर्शनात भाग घेण्याची संधी त्यांना मिळाली होती. ठाण्यात दोन वर्षांपूर्वी भरलेल्या उपवन आर्ट फेस्टिव्हलमधील कला प्रदर्शनातही त्यांचे चित्र प्रदर्शित झाले होते. त्यात त्यांच्या चित्राला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले.
एका परिचिताकडून अमेरिकेतील कलादालनातही प्रदर्शनासाठी अर्ज करता येऊ शकतो, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी २०१४ च्या फेब्रुवारी महिन्यात अर्ज केला होता. आठ महिन्यांनंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच त्यांना कलादालनात प्रदर्शन भरविण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार सध्या १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ‘लाइफ इन द सिटी’ या विषयावरील त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन कॅरो शहरातील बॉन्ड पार्क कम्युनिटी सेंटरमध्ये भरले आहे. कॅनव्हासवर अ‍ॅक्रेलिक रंगांनी तसेच पेपरवर शाईने रेखाटलेली त्यांची २५ चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. त्यांनी त्यांची चित्रे कुरिअरमार्फत पाठवून दिली. वजन कमी भरावे म्हणून फायबरच्या फ्रेम वापरल्या. प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त कांचन घारपुरे नुकत्याच अमेरिकेतही जाऊन आल्या.

निवड होणे महत्त्वाचे
अमेरिकेत प्रदर्शनासाठी अर्ज करताना तेथील कलादालनाचे भाडे आपल्याला परवडेल का हा प्रश्न माझ्या मनात होता. मात्र तिथल्या अनेक उपनगरांमधील कलादालनांमध्ये चित्रविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर भाडे आकारले जाते. माझ्या चित्रांचे प्रदर्शनही याच तत्त्वावर आहे. चित्रविक्रीतून येणाऱ्या उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम कलादालनाचे भाडे म्हणून कापून घेतले जाते. उर्वरित ८० टक्के रक्कम चित्रकाराला दिली जाते. मात्र प्रदर्शनासाठी निवड होणे महत्त्वाचे असते.
-कांचन घारपुरे,
चित्रकार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2015 12:33 am

Web Title: usa painting in thane
टॅग Painting
Next Stories
1 टेस्टी ‘ट्विस्टी रॅप्स’
2 अकरा वष्रे सिग्नल यंत्रणा लालफितीत
3 कल्याण पूर्वची दैना संपवा!
Just Now!
X