News Flash

संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण केंद्रे बंद

पावसामुळे या केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती.

काही शहरांत वादळाचा परिणाम तर अन्यत्र टंचाई; केवळ भिवंडी पालिका क्षेत्रात नागरिकांचे लसीकरण

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे आणि उल्हासनगर या शहरांसह जिल्हाच्या ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रे सोमवारी बंद ठेवण्यात आली होती, तर कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये लशीचा साठा उपलब्ध न झाल्यामुळे केंदे्र बंद ठेवावी लागली. भिवंडी महापालिका क्षेत्रातील केंद्रांवर सोमवारी लसीकरण सुरू होते. दुसरीकडे, करोना चाचणी केंद्रे सुरू असली तरी तेथे नेहमीच्या तुलनेत कमी वर्दळ होती.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे सोमवारी बंद ठेवली होती. तर शहरातील ११ करोना चाचणी केंद्रे नेहमीप्रमाणे सुरूच होती. पावसामुळे या केंद्रांवर नागरिकांची नेहमीपेक्षा गर्दी कमी होती. उल्हासनगर शहरात आणि ठाणे ग्रामीणमध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्रे सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. तर या दोन्ही भागांत करोना चाचणी केंदे्र मात्र सुरू होती.

भिवंडी शहरातील दोन केंद्रांवर ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू होते. पावसामुळे या केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. तसेच शहरातील करोना चाचणी केंद्रे सुरू होती. भिवंडी शहरात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. पावसामुळे या केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. कल्याण डोंबिवली पालिकेकडे मागील चार दिवसांपासून कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन लशीचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरातील १० लसीकरण केंदे्र सोमवारी बंद ठेवली होती. कल्याणमधील आर्ट गॅलरी येथील १८ ते ४४ वयोगटासाठी सुरू करण्यात आलेले लसीकरण केंद्रही सोमवारी बंद ठेवण्यात आले होते. पालिका हद्दीत दररोज ३ हजार ५०० करोना चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांमधून दररोज चारशे ते पाचशे करोना रुग्ण आढळून येत आहेत. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत मात्र लशींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले होते, तर दोन्ही शहरांमध्ये करोना चाचण्या मात्र सुरू होत्या.

आजही लसीकरण बंद

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार शहरात रविवार रात्रीपासून अतिवृष्टी सुरू आहे. तसेच वेगाने वारे वाहण्याची शक्यता आणि पर्जन्यवृष्टीची संभाव्यता आहे. त्यामुळे लसीकरणासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व लसीकरण केंद्रे आज, मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. पर्जन्यवृष्टीच्या शक्यतेने वीजप्रवाह खंडित होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर धोकादायक इमारती, रस्त्यावर पाणी साचणे, वृक्ष पडून वाहतुकीस अडथळा निर्माण होणे तसेच इतर संभाव्य धोके लक्षात घेऊन लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे आयुक्त म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:33 am

Web Title: vaccination centers closed in the entire district akp 94
Next Stories
1 विनाकारण फिरणाऱ्या २५० जणांची चाचणी
2 साठा नाही तरीही परवानगीची प्रक्रिया पूर्ण
3 तोतया पोलीस अटकेत
Just Now!
X