News Flash

ठाण्यात सामूहिक योगासनांचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी ठाणे परिसरात वीस ठिकाणी योगासनाची प्रात्यक्षिके होत असून त्यात पाच हजार ठाणेकर सहभागी होणार आहेत.

| June 18, 2015 12:09 pm

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी ठाणे परिसरात वीस ठिकाणी योगासनाची प्रात्यक्षिके होत असून त्यात पाच हजार ठाणेकर सहभागी होणार आहेत. ‘आरोग्य भारती’ या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार असून गेल्या एक महिन्यापासून त्याची पूर्वतयारी सुरू आहे.
समितीच्या माध्यमातून आत्तापर्यंत ठाण्यातील साधारण ६५ विविध संस्था, तसेच ४५ गृहनिर्माण संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. आरोग्य भारतीच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: गृहनिर्माण संस्थांनी उपक्रमाचे स्वागत केले आहे. योगाचे महत्त्व सांगण्यासाठी समितीतर्फे जनसंपर्क अभियान सुरू आहे. या अंतर्गत २५ हजार ठाणेकरांना वैयक्तिकरीत्या भेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानिमित्ताने ‘आरोग्य भारती’ने योगशास्त्र समजावून देण्यासाठी एक सोपे पुस्तक प्रकाशित केले आहे. एक मोठा कार्यक्रम करण्याऐवजी उपक्रमाच्या विकेंद्रीकरणावर भर दिला जात आहे.
नौपाडा- पाचपाखाडीत चार, पूर्व भागात पाच, स्टेशन रोड- चेंदणी, कळवा शाळा, खारेगाव, मुंब्रा, श्रीरंग- वृंदावन येथे प्रत्येकी एका ठिकाणी, घोडबंदर- वागळे- पोखरण- वर्तकनगर येथे सहा अशा वीस ठिकाणी रविवार, २१ जून रोजी सकाळी ७ ते ८ दरम्यान ही योगासने होणार आहेत. सर्वाना विनामूल्य प्रवेश आहे. महिलांसाठी स्वतंत्र कार्यक्रम श्रीराम व्यायामशाळा येथे होणार आहे. सर्व केंद्रांवर अनुभवी योगतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.  संपर्क : ९९६९०१७३६०, ९९६९०८८१७१

अंबरनाथमध्ये शिबिरे
जागतिक योग दिनानिमित्त अंबरनाथ येथे योग विद्याधाम या संस्थेच्या वतीने विविध केंद्रांवर विनामूल्य योग शिबिरे आयोजित केली आहेत. १४ ते २० जूनदरम्यान प्राणायाम शिबीर, २२ ते २८ जूनदरम्यान योग संजीवन शिबीर, २१ ते २७ जूनदरम्यान मधुमेहमुक्त भारत अभियान योग विद्यापीठ, बंगळुरू या संस्थेच्या वतीने राबविण्यात येणार आहे. रोटरी कम्युनिटी सेंटर- वडवली, सूर्योदय सभागृह- साई विभाग, शिवधाम क्लब- शिवधाम संकुल, ज्येष्ठ नागरिक भवन- स्वामी समर्थ चौक, मनोहर कला सांस्कृतिक केंद्र-कानसई, रॉयल पार्क क्लब- रॉयल पार्क आदी ठिकाणी ही शिबिरे होणार आहेत.  संपर्क- ०२५१/ २६००२५१.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2015 12:09 pm

Web Title: various events in thane on the occasion of international yoga day
Next Stories
1 ठाण्यात प्लेटलेट दान मोहीमेचे आयोजन
2 ७५० विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष
3 डोंबिवलीतील प्रामाणिक रिक्षाचालकाचा सत्कार
Just Now!
X