News Flash

वसई : आईच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून १८ वर्षीय मुलानेच केली आईची हत्या

त्री पावणे दहाच्या सुमारास चामड्याच्या पट्ट्याने आईचा गळा आवळून खून केला, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे

आईला असलेले मद्याचे व्यसन आणि त्यामुळे घरात सतत होणाऱ्या भांडणांना तो कंटाळाला होता. (प्रातिनिधिक फोटो सौजन्य रॉयटर्सवरुन साभार)

वसईत एका अठरा वर्षे वयाच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईची गळा आवळून हत्या केली आहे. वसई पश्चिमेच्या कोळीवाडा येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली.

वसई पश्चिमेच्या कोळीवाडा येथील आयुष अपार्टमेंटमधील मेरी यादव (वय ५९) ही महिला मुलगा सनी (१८) व मुलगी पूजासोबत राहत होती. मेरी हिच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मेरीला दारूचे व्यसन असल्यामुळे घरात सतत या गोष्टीवरून वाद-विवाद होत होते. मंगळवारी या वादातून मुलगा सनीने रात्री पावणे दहाच्या सुमारास चामड्याच्या पट्ट्याने आईचा गळा आवळून खून केला. वसई पोलिसांनी आरोपी सनीला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

सनीचे बारावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. आईला असलेले मद्याचे व्यसन आणि त्यामुळे घरात सतत होणारी भांडणं यामुळे सनीने ही हत्या केल्याचे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 11:14 am

Web Title: vasai crime news 18 year boy killed his mother scsg 91
Next Stories
1 ठाण्यात ‘डान्स बार’वर बडगा
2 शेतकरी आत्महत्येप्रकरणी चार वर्षांनी गुन्हा
3 शिळफाटा का तुंबतो?
Just Now!
X