वसई : वसईच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने मंगळवारी विरारजवळील ग्लोबल सिटी परिसरात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या घरावर छापा टाकून तीन मुलींची शरीरविक्रय व्यवसायातून सुटका केली आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार येथील ग्लोबल सिटी परिसरात एक दाम्पत्य आपल्या घरात वेश्या व्यवसाय चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे, महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी बोरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी व त्यांच्या पथकाने एक बनावट ग्राहक बनवून पाठविले होते.  सौदा नक्की झाल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर यांच्या मोबाइलवर संदेश आला. त्यानंतर पथकाने सापळा रचून छापा टाकला. या वेळी तीन मुली आढळून आल्या.