News Flash

ख्रिस्तायण : वसईतील प्रतिभावंत ख्रिस्ती साहित्यिक

वसईतील सामाजिक चळवळीत अनेक साहित्यिकांचे योगदाने आहे. सुवार्ता मासिकाद्वारे अनेक साहित्यिक तयार झाले.

(संग्रहित छायाचित्र)

दिशा खातू

वसईतील सामाजिक चळवळीत अनेक साहित्यिकांचे योगदाने आहे. सुवार्ता मासिकाद्वारे अनेक साहित्यिक तयार झाले. वसईत अनेक प्रतिभावान ख्रिस्ती साहित्यिक आपला ठसा उमटवत गेले. त्यांच्या लेखणीतून सकस साहित्याची निर्मिती होत गेली.

जगभरातील साहित्य संशोधकांचे म्हणणे आहे की, शिक्षण आणि साहित्यामुळे माणसांत परिवर्तन होते आणि त्यांच्या जाणिवा-नेणिवा विकसित होतात. मग त्या समृद्ध होऊन, माणसांची शक्तिकेंद्र जागृत होतात आणि माणूस पूर्णत्वाच्या दिशेने पुढे जातो. शिक्षण आणि साहित्यामुळे माणसांतमध्ये होणारे परिवर्तन वसईत तंतोतंत पाहायला मिळते. माणूस स्वत:विषयी, समाजाविषयी, निसर्गाविषयी आणि देशाविषयी जागृक होतो. साहित्याचे साधन वापरून तो इतर लोकांना आरसा दाखवतो, मार्ग दाखवतो.

मराठी-ख्रिस्ती साहित्यातील महत्त्वपूर्ण भाग म्हणजे ‘सुवार्ता’ मासिक ज्याने साहित्य प्रेमी आणि साहित्यिक घडवले. १९८३ नंतर या मासिकाच्या संपादकपदी फादर अ‍ॅंडर्य़ू रॉड्रीग्ज आले. त्यांनी शोक-समाचारात एक महत्त्वाचा बदल केला तो असा की त्यात बायबल मधील आशावादी, जीवनदायी वचने लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी धर्म तत्त्वांबरोबर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बदलांचे वेळोवेळी विेषण केले. संतत्तिनियमन, हुंडा पद्धत, विवाहपूर्व मार्गदर्शन, शेती, आरोग्य समस्या, स्त्रीयांचे प्रश्न, विद्यर्थ्यांच्या समस्या इत्यादी मुद्दे प्रकर्षांने मांडले.

मग फादर फ्रान्सिस कोरीया यांना सुवार्ता मासिकाचे संपादक होण्याचा मान मिळाला. पाच वर्षांंच्या कार्यकाळात त्यांनी सर्व कामकाज अधिकाधिक सुनियोजित करण्याचा प्रय केला. मासिकाचे मुद्रण मुंबईतून सुरु केले, त्यामुळे त्याची गुणवत्ता वाढली. अंक महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरोघरी पोहचू लागला. त्यांच्या काळात चर्चमधील फादर, प्रिस्ट देखील लेखन करू लागले, त्यांचे विचार मांडू लागले. त्यांनी ‘चिंतनिका’ नावाचे सदर सुरु केले ज्यात लोकांचे रोजच्या जीवनातले प्रश्न, समस्यांना स्थान दिले गेले. यादरम्यान मासिकाचे व्यवस्थापकीय मंडळ बदलल्यामुळे चर्चचे विषय मोठय़ा प्रमाणात हाताळले जाऊ लागले. तसेच, त्यांनी सामवेदी भाषेचे व्याकरण, सामवेदी भाषेतील लोकगीते-वाक्प्रचार, सामवेदी-ख्रिस्ती इतिहास इत्यादी विषयांवर पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

सध्या रेमंड परेरा हे सुवार्ता मासिकाचे संपादक आहेत. सुवार्ता मासिकाची सुरुवात होण्यापूर्वी पासून ते सुरु झाल्यानंतर साहित्य निर्मितीच्या केलेने प्रेरीत होऊन अनेक साहित्यिक निर्माण झाले. त्यामध्ये रॉक काव्‍‌र्हालो हे महत्त्वाचे नाव होय. त्यांच्या अन्य साहित्य कृतींपैकी योगिनी आणि शांभवी ही दोन सुरुवातीच्या काळातील पुस्तके सर्वाधिक लोकप्रिय ठरली. २६ ते २८ डिसेंबर १९७७ रोजी सोलापूर येथे झालेल्या अकराव्या महाराष्ट्र ख्रिस्ती संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला.

वसईतील साहित्य क्षेत्रातील तसेच बोलीभाषेतील साहित्य निर्मिती करणा-यांमधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रा. डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो होय. त्या सुप्रसिद्ध कवयित्री आहेत. त्यांचे वाडवळी बोली भाषेतले वाडीतल्या वाटा कथासंग्रहातील तीन कथांचा महाविद्यलयीन अभ्यासRमात समावेश झालेला आहे. ५, ६ फेब्रुवारी २००० रोजी नाशिक येथे भरलेल्या मराठी-ख्रिस्ती साहित्य सन्मेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, विविध समाज, संस्कृती यांच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी भारतीय समाजाचे महावस्त्र विणले गेलेले आहे.

वसईमध्ये २००९ साली मराठी-ख्रिस्ती साहित्य सन्मेलन भरले. त्यावेळी फादर मायकल जी हे अध्यक्ष होते. पुरोगामी विचारांचे असलेले फादर मायकल जी वसईतील विविध सामाजिक संघटनात सक्रीय असून अनेक चळवळीत त्यांचा सहभाग आहे. विविध सामाजिक प्रश्नानवर ते परखड भाष्य करत असतात. अनेक चुकीच्या प्रथांवर त्यांनी थेट आवाज उठवला आहे

संमेलनातील अध्यक्षीय भाषणात त्यांनी  वसईच्या साहित्य परंपरेचे, साहित्यातील योगदाना बद्दल तसेच मुंबईच्या कवेत असूनही आपली संस्कृती अबाधित ठेवल्याबद्दल कौतुक केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 3:27 am

Web Title: vasai talented christian literary
Next Stories
1 गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवा
2 गणपती मिरवणुकांमुळे डोंबिवलीत रस्तोरस्ती कोंडीचे विघ्न
3 ठाण्यात ‘एअरटेल’ कंपनीच्या कार्यालयावर जप्ती
Just Now!
X