वसई-विरार महापालिकेचा शिलकीचा अर्थसंकल्प; कोणतीही करवाढ नाही
कुठलीही करवाढ नसलेला आणि तब्बल १ हजार ९९३ कोटी उत्पन्न असलेला वसई-विरार महापालिकेचा शिलकी अर्थसंकल्प गुरुवारी महापालिकेत सादर करण्यात आला. करवाढ न करून पालिका प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिलेला आहे. याशिवाय विविध विकास योजनांसाठी भरघोस तरदूत करण्यात आलीे आहे.
स्थायी समितीे सभापतीे नितीन राऊत यांनी गुरुवारी दुपारी सभागृहात हा अर्थसंकल्प सादर केला. १ हजार ७५५ कोटी २६ लाख रुपये शिलकी दाखविण्यात आली आहे. उत्पन्न वाढीचे अनेक मार्ग त्यात दाखविण्यात आले आहेत. त्यात स्वच्छता विभागातून ३९ कोटी ८८ लाख रुपये, नगरचना विभागातून १५३ कोटी ५१ लाख ८० हजार, सर्वसाधारण विकासकामांसाठी विविध खात्यांकडून अंदाजे ४२ कोटी, अनुदानापोटी २४२ कोटी रुपयांचे उत्पन्न गृहीत धरण्यात आलेले आहे. पाणीेपुरवठा योजनेतून १७५ कोटी, तसेच सुवर्ण जयंतीे शहरी रोजगार योजना, पुनरूत्थान योजना, सॅटेलाईट सिटी, अमृत योजना आदी विविध योजनेतून ३९० कोटी ६६ लाख रुपयांचे अनुदान गृहीत धरण्यात आले आहे. उत्पन्नवाढ गृहीत घरून विविध योजनांसाठी भरघोस तरदूत करण्यात आलेलीे आहे.
उत्पन्न वाढीचे प्रयत्न आणि विविध विकास कामांसाठी तरदूत या अर्थसंकल्पात करण्यात आलेलीे आहे. २ हजार २४२ कोटींचा रिंग रूट प्रकल्प, ६०० कोटींचा उड्डाणपूल आदी तरतूदी त्यात आहेत.

अर्थसंकल्पाची वैशिष्टय़े
’ मालमच्चा कर पाणीपट्टी आगाऊ भरली तर १५ टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.
’ जाहिरात आणि होर्डिग धोरण राबवून ८ कोटींचे उत्पन्न अपेक्षित.
’ शहरात आपत्कालीन व्यवस्था केंद्र उभारणार.
’ नवीन उड्डाणपूल, रिंग रूट, रुग्णालये.
या योजनांवर खर्च
’ पाण्याचा फेरवापर योजना
’ निसर्ग ऋण प्रकल्प
’ रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना
’ संगणक व्यवस्थापन केंद्र
’ पर्यटनस्थळे विकास
’ वनीकरण
’ अंध-अपंगांच्या योजना
’ सांस्कृतिक कार्यक्रम

विभाग                                                           तरतूद
बांधकाम विभाग                                   ५५१ कोटी २० लाख
पाणीे पुरवठा योजना                              ३७४ कोटी ३३ लाख
दफनभूमीसाठी                                     ७ कोटी १० लाख
अग्निशमन विभागासाठी                    ३३ कोटी
साफसफाई योजना                               १५५ कोटी ८० लाख
रुग्णालय व्यवस्थापन                       ४८ कोटी
क्रीडा                                                 १९ कोटी
तलाव विकास                                      ५१ कोटी