News Flash

पूरकारणांचा अहवाल खुला

‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात महापालिका आयुक्तांची घोषणा

‘लोकसत्ता लाऊडस्पीकर ’ कार्यक्रमाला वसईकरांनी तुडुंब गर्दी केली होती.

‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात महापालिका आयुक्तांची घोषणा

वसई : वसईतील पुरपरिस्थितीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविणार्म्या १२ कोटी रुपये  खर्चून स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल अखेर महापालिकेने सर्वसामान्य जनतेसाठी खुला केला आहे. या अहवालात वसईत पूर का आला, त्याला जबाबदार कोण ते नमूद करम्ण्यात आले आहे. हा अहवाल जनतेपासून दडविण्यात आला होता. मात्र ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात व्यक्त झालेली सामाजिक कार्यकर्त्यांची मते आणि उपस्थित नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना यापुढे नमते घेत हा अहवाल सार्वजनिक करण्याची घोषणा महापालिका आयुक्त बी. जी. पवार यांनी केली.

जुलै २०१८ मध्ये वसई विरार शहराच्या इतिहासातील सर्वात मोठा पुर आला होता. अतिवृष्टी जरी झाली असली तरी अतिRमणे, बुजविलेले नैसर्गिक नाले, बेकायदा मातीभराव आदी मानवनिर्मित संकटांमुळे पूर आला होता. दहा दिवस वसईचे जनजीवन ठप्प होऊन वसई विरारचा इतर शहरांशी संपर्क तुटलेला होता. या पुराने ५ जणांचे बळी घेतले आणि नागरिकांच्या वैयक्तिक मालमत्तेसह कृषी, औद्य्ोगिक आदी मालमत्तांचे शेकडो कोटींचे नुकसान झाले होते. हा पुर का आला आणि भविष्यात पूर येऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात याचा अभ्यास करम्ण्यासाठी पालिकेचे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी सत्यशोधन समितीची स्थापना केली होती. या समितीत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी),

ही समिती ८ प्रमुख मुद्दय़ांचा अभ्यास करत आहे. त्यात शहराच्या सध्याची रचना, पायाभूत सोयीसुविधा, विकास आराखडा यांचा समावेश आहे. वसईत पडणार्म्या पावसाचे स्वरूप आणि यापुर्वी पडलेला पाऊस यांचा अभ्यास करून पाणी साठवण्याचे क्षेत्र शोधले जाणार आहे. शहरातील पाणी तुंबण्याची कारणे काय आहेत आणि ठिकाणे कोणकोणत्या ठिकाणी पाणी साठवले जाते ते निश्चित त केली जाणार आहेत. याशिवाय ही समिती एक ”मास्टर प्लॅन” तयार करणार असून त्यात शहरातील खाडय़ा, नाले, रस्ते शोधून शहराच्या सिमा निश्चित केल्या जाणार आहेत. नाल्याच्या पाण्याची प्रवाहाची क्षमता तपासली जाणार आहे. या समितीती नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, डॉ ज्योतीप्रकाश

(अभियंता),        डॉ.आर नागराज (सीईआरई), डॉ.आर.एस.जांगिड (अभियंता) आणि डॉ. सुधीर गुप्ता (सीईएसई) आदींचा समावेश होता. या कामसााठी सत्यशोधन समितीला १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या सत्यशोधन समितीने वसईतील सर्व प्रभाग समित्यांमध्ये जनसुनावणी घेऊन नागरिकांच्या समस्या तसचे सुचना ऐकून घेतल्या होत्या. सत्यशोधन समिती पुन्हा पाणी तुंबू नये यासाठी नजिकच्या काळात लगेच करावयाच्या उपाययोजना सुचविणारा अहवाल सादर करणार होती. तसेच दिर्घकालीन उपाययोनजा सांगणारा दुसरा अहवाल सादर करम्णार होती. पहिला अहवाल समितीने पालिेकेला सादर केला होता, मात्र तो जनतेसाठी खुला करण्यात आलेला नव्हता. माहिती अधिकार कायद्यअंतर्गत माहिती मागूनही हा अहवाल जनतेला देण्यात येत नव्हता. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी होती. पालिकेने नालेसफाई सुरू केली, उपाययोजना सुरू केल्या तरी अहवाल जनतेला मिळत नव्हता.

दरम्यान, वसईतील पुरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेऊन उपाय शोधण्यासाठी लोकसत्ताने लाऊडस्पीकर या कार्यक्रमाचे आयमेजन केले. शनिवारी ११ मे रोजी कार्यक्रम झाला. मात्र या कार्यRमात अहवालावरून रणकंदन माजण्याची

शक्यता असल्याने पालिकेने कार्यक्रमापूर्वीच शनिवारी दुपारी अहवाल सार्वजनिक केला. या अहवालासाठी पाठपुरावा करम्णारे पर्यावरण संरक्षण समितीच्या समीर वर्तक यांच्या घरीच दुपारी अहवाल नेऊन देण्यात आला. पुरग्रस्तांसाठी  लोकसत्ताने आयोजित केलेल्या लाऊडस्पीकर या कार्यRमाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया वसईतील नागरिकांनी दिली आहे.

‘ आम्हाला यापुर्वी समितीकडून ज्या सुचना करम्ण्यात आल्या होत्या त्यानुसार आम्ही नालेसफाई करम्णे, नवीन कल्वर्ट बांधणे, नाल्यांवरील अतिक्रमणे काढणे आदी कामे सुरू केली होती. मात्र लेखी स्वरूपातील अहवाल नुकताच आम्हाला प्राप्त झाल्याने तो आम्ही जनतेला खुला करण्यात आला आहे,’ अशी माहिती पालिका आयुक्त बी.जी.पवार यांनी दिली. सध्या सुरू असलेली कामे या अहवालानुसारच होत आहेत असे ते म्हणाले. जर अहवालानुसार कामे होत नसल्याचे कुणाला आढळले तर तशा सुचना पालिकेला कराव्यात असेही पवार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 4:43 am

Web Title: vasai virar municipal corporation commissioner in loksatta loudspeaker event
Next Stories
1 मातृदूध संकलनाची गाडी अडकली
2 शहरबात : घोळ निस्तरण्याची गरज
3 तिकीट घरांमुळे रेल्वे पादचारी पुलांवर कोंडी
Just Now!
X