‘वसई-विरार’च्या वाचकांसाठी नवी पर्वणी

वसई : ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख, स्तंभलेख यांवर नेहमीच व्यक्त होणाऱ्या मीरा-भाईंदर, वसई, विरार पट्टय़ातील वाचकांसाठी ‘लोकसत्ता’ची ‘आपली आवड’ ही स्पधा गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे. ‘लोकसत्ता’तील आपल्या आवडीच्या बातमी, लेखाची निवड करण्यासोबतच त्याबद्दल आपले मतप्रदर्शन करण्याची संधी या स्पर्धेद्वारे वाचकांना लाभणार आहे. एवढेच नव्हे तर, वाचकांनी पाठवलेल्या अभिप्रायांतील वैशिष्टय़पूर्ण आणि लक्षवेधी अभिप्रायांबद्दल बक्षिसेही दिली जाणार आहेत. ही स्पर्धा मंगळवार ते शनिवार या दिवसांमध्ये होईल.

दर्जेदार बातम्या, विचारमंथन घडवणारे लेख आणि साहित्यातील अभिरुची वाढवणारे लिखाण यामुळे ‘लोकसत्ता’ वसई, विरार शहरांत नेहमीच वाचकप्रिय राहिला आहे. ‘लोकसत्ता’तील लेख, बातम्यांवर आपली मतमतांतरे व्यक्त करण्यात वसई, विरारमधील अनेक पत्रलेखक, सामाजिक कार्यकर्ते नेहमीच आघाडीवर असतात. वाचकांबरोबरची ही घट्ट वीण अधिक बळकट करण्यासाठी ‘आपली आवड’ ही दैनंदिन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा गुरुवार, २७ जूनपासून सुरू झाली आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वाचकांना ‘लोकसत्ता’चा मुख्य अंक तसेच ‘लोकसत्ता वसई-विरार’ या सहदैनिकात प्रसिद्ध झालेली आपल्या आवडीची बातमी, लेख, स्तंभलेख याविषयी ईमेलद्वारे कळवायचे आहे. तो मजकूर का आवडला, हेदेखील वाचकांना ८० ते १०० शब्दांत मांडायचे आहे. हा अभिप्राय दररोज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आमच्याकडे ईमेल करायचा आहे. त्याचवेळी आपली मते ऑनलाइन पाठविताना ती युनिकोडद्वारे (मराठी) पाठवावीत.  वाचकांनी पाठवलेल्या अभिप्रायांतून सर्वोत्तम अभिप्राय पाठवणाऱ्या वाचकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून त्यांनी मांडलेल्या मतांना  ‘लोकसत्ता वसई-विरार’ सहदैनिकातून प्रसिद्धीही दिली जाईल.  ही स्पर्धा वसई, विरार, मीरा रोड, भाईंदर, नालासोपारा येथे राहणाऱ्या वाचकांपुरतीच मर्यादित असून स्पर्धेसाठी अन्य अटी व शर्तीही लागू आहेत. स्पर्धेच्या अटी तसेच बक्षिसांसंदर्भात अन्य बाबी जाणून घेण्यासाठी वाचत राहा ‘लोकसत्ता’!

काय कराल?

*  दररोज ‘लोकसत्ता’चा मुख्य अंक तसेच ‘लोकसत्ता वसई-विरार’ सहदैनिकातील तुम्हाला आवडलेली बातमी, लेख, स्तंभलेख याविषयी आम्हाला कळवा.

*  संबंधित बातमी वा लेख तुम्हाला का आवडली, हे ८० ते १०० शब्दांत कळवायचे आहे.

*  तुमची आवड, त्यावरील मते आम्हाला loksattacontest@expressindia.com या ई-मेलवर दररोज सायंकाळी ६ वाजेपर्यंत  पाठवायचे आहेत. वाचकांना ९१३७३२३५२१ या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावरही आपल्या प्रतिक्रिया पाठविता येतील

*  या ई-मेलमध्ये तुमचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक तसेच ईमेलही नमूद  करा.

*  बक्षिसास पात्र ठरलेल्या वाचकांचे अभिप्राय ‘लोकसत्ता वसई-  विरार’मधून प्रसिद्ध केले जातील.

* अटी व शर्ती लागू.