News Flash

सौरऊर्जेवरील दिवे, विद्युत वाहने ; वसईच्या तरुणाची अनोखी शक्कल

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने दुचाकीस्वारांसाठी एसी हेल्मेट तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

कल्पेश भोईर लोकसत्ता

वसई : टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करून त्याचा वापर घरगुती आणि  इतर ठिकाणच्या वापरासाठी करता यावे यासाठी वसईत राहणाऱ्या नितीन सकपाळ या तरुणाने अनोखी शक्कल लढवून  टाकाऊ वस्तूंपासून  दैनंदिन वापरात येणाऱ्या विविध प्रकारच्या टिकाऊ  वस्तू तयार करून यशस्वी प्रयोग केले आहेत.

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत असताना प्रत्येक वस्तूंचा पुनर्वापर कसा करता येईल याचे उदाहरण यातून दिसून आले आहे. सध्या विविध कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असते त्यावर छोटय़ा छोटय़ा गोष्टींपासून उपाययोजना केल्या जाऊ शकतात हे अनेकांनी सिद्ध केले आहे. वसईतील नितीन सकपाळ यांनीही विविध प्रकारच्या वस्तूं तयार केल्या आहेत. नितीन हे पेशाने मेकॅनिकल इंजिनिअर असल्याने त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे, इलेट्रिक वाहने, स्वयंचलित पाळणा, विद्युत पेहराव, पेढा निर्मिती करणारे स्वयंचलित यंत्र,   मशीन, गिफ्ट बबल मशीन अशा विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या आहेत नुकताच त्याने इलेक्ट्रॉनिक गाडी तयार केली आहे त्यामध्ये त्याने लोखंडी पाईप , बॅटरी,  टाकून देण्यात आलेली प्लास्टिक खुर्ची, इंजिन, अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा वापर करून ही गाडी तयार केली आहे. ही गाडी साधारणपणे ४० ते ५० च्या गतीने चालविली जाऊ शकते सध्याच्या घडीला प्रदूषण रोखण्यासाठी अशा प्रकारच्या गाडीचा चांगला उपयोग होऊ शकतो तसेच ही गाडी सौरऊर्जेवरही चालू शकते. यामुळे पैशांचीही बचत होईल. तर दुसरीकडे लोणच्याच्या बरणीची झाकणे जमा करून त्यामध्ये विद्युत दिवा लावण्यात आला आहे. हा दिवा सौरऊर्जेवर चालणारा असल्याने याचा ज्या भागात वीज नाही अशा भागात चांगल्याप्रकारे होऊ शकतो.

मागील २० वर्षांपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याचा छंद आहे तसेच नागरिकांना ज्या प्रमाणे एखादी गोष्ट बनवून हवी आहे त्यानुसार बनवूनही दिल्या जात आहेत दिल्या जात असल्याचे नितीन याने सांगितले.सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने दुचाकीस्वारांसाठी एसी हेल्मेट तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांना गारेगार प्रवास करता येऊ शकतो असे नितीन सकपाळ यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 1:01 am

Web Title: vasai youth make solar lights electric vehicles from different types of scraps zws 70
Next Stories
1 करोना निर्बंधांचे पालन न केल्यास कारवाई
2 बाजारपेठेतही सम-विषम पार्किंग
3 सॅनिटायझर, मास्कची जास्त दराने विक्री केल्यास कारवाई
Just Now!
X