22 November 2019

News Flash

Video: उल्हासनगरमधील शाळेत वर्ग सुरु असताना छत कोसळले अन्…

हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे

व्हिडिओ व्हायरल

ठाण्यामधील उल्हासनगरमधील शाळेत वर्ग सुरु असतानाचा अचानक वर्गाचे छत विद्यार्थ्यांवर पडले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातामध्ये तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थी वर्गात बसलेले दिसत आहेत. शिक्षिका त्यांना शिकवत असतानाच अचानक छताचा एक भाग विद्यार्थ्यांवर पडतो. त्यानंतर वर्गात एकच गोंधळ उडालेला व्हिडिओमध्ये पहायला मिळते. शिक्षिका लगेच विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी धावतानाही या व्हिडिओत दिसत आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार उल्हासनगरमधील झुलेलाल शाळेत घडला आहे.

काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील मदरश्यावर एक उच्च विद्युत दाबाची तार पडल्याने २० विद्यार्थी जखमी झाले होते. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

First Published on June 20, 2019 2:23 pm

Web Title: video cement plaster collapsed in ulhasnagar jhulelal school scsg 91
Just Now!
X