News Flash

नातवाने उघड केला आजोबांचा प्रताप; आजीला होणारी मारहाण कॅमेऱ्यात कैद करुन व्हिडीओ केला व्हायरल

वयोवृद्ध पत्नीला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; व्हायरल व्हिडीओवरुन संताप

वयोवृद्ध पत्नीला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; व्हायरल व्हिडीओवरुन संताप

वयोवृद्ध नागरिकाकडून आपल्या पत्नीला लाथाबुक्क्या आणि बादलीने मारहाण करत असल्याचा संतपाजनक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आठवड्याभरापूर्वीचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून वृद्ध पत्नीला अमानुषपणे होणारी मारहाण पाहून संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण मलंगगड जवळील द्वारली गावातील हद्दीत हा प्रकार घडला आहे.

गजानन बुवा चिकणकर असं माहाण कऱणाऱ्या या वृद्धांचं नाव आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे पाण्याच्या वादातून ते आपल्या पत्नीला जाब विचारत असून यावेळी बादलीने तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. महिला वारंवार मला मारु नका अशी विनंती करत असतानाही ते मात्र अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी घऱात इतर महिलाही काम करताना दिसत असून कोणीही मध्यस्थी करत मदतीसाठी येताना दिसत नाही.

महिलेच्या नातवाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आजोबांकडून होणारी अमानुष मारहाण कॅमेऱ्यात कैद केली आहे. ३१ मे रोजी ही घटना घडली असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आली आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत घटनास्थळ गाठलं होतं. यावेळी गजानन बुवा चिकणकर वारीसाठी आळंदीला गेले असल्याचं कुटुंबाने सांगितलं. दरम्यान याप्रकरणी त्यांच्या पत्नीने पोलिसांत कोणतीही तक्रार दिलेली नाही. पोलिसांना कुटुंबाला समज दिली असून गजानन बुवा चिकणघर यांनाही समज दिली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 11:35 am

Web Title: video of man beating wife in kalyan viral on social media sgy 87
Next Stories
1 जिथे हिल्स घालून चालताही येत नाही, तिथे ही पोरगी चक्क…..हा व्हिडिओ पाहाच!
2 Video : …आणि फिल्डर बाउंड्री लाईनच विसरला! नक्की काय घोटाळा झाला!
3 राष्ट्रध्यक्षांचं Tweet Delete केल्याने ‘या’ देशाने ट्विटरवर घातली बंदी; निर्णयामुळे भारतीय कंपनीला ‘अच्छे दिन’?
Just Now!
X