खासगी रुग्णालयातील एक खाट ‘डायलिसिस’वरील रुग्णांसाठी राखीव

वसई : करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन वसई विरार महापालिकेने आता करोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांना घरच्या घरी अलगीकरणात राहण्याची मुभा दिली आहे. घरात पुरेशी जागा असेल आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्लय़ानंतर घरातच अलगीकरणात राहता येणार आहे. यामुळे पालिकेच्या करोना केंद्रात रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल थांबणार आहे.

एखादा व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचे अलगीकरण केले जाते. पालिकेने उभारलेल्या अगलीकरण केंद्रात त्यांना ठेवण्यात येते. तेथे या कुटुंबीयांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेऊन ते चाचणीसाठी पाठवले जाते. त्याच्या अहवाल आल्यानंतर जर ते नकारात्मक असतील तर त्यांना घरी सोडण्यात येते. या कालावधीत ४ ते ५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे पालिकेच्या अलगीकरण कक्षातील तेवढय़ा खाटा भरतात. शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ६०० च्या वर गेली आहे. करोनाच ग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींना (हाय रिस्क कॉन्टॅक्ट) राहण्यासाठी पालिकेने विरार पष्टिद्धr(१५५)मेच्या बोळींज येथील म्हाडा कॉलनीत संस्थात्मक अलगीकरण केंद्र उभारले आहे. मात्र वाढत्या संख्येमुळे ते देखील अपुरे पडू लागले आहे. यासाठी पालिकेने आता करोनाग्रस्तांच्या कुटुंबियांना तसेच संपर्काती व्यक्तींना घरच्या घरी अलगीकरणात राहण्यास मुभा दिलेली आहे.

करोनाबाधीत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या घरात पुरेसी आणि स्वतंत्र जागा असली तर त्यांना घरच्या घरी अलगीकरणात राहता येईल असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्या व्यक्तींचे घर अलगीकरणास योग्य आहे अथवा नाही याची पाहणी संबंधित प्रभागाचे साहाय्यक आयुक्त आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्य्कीय अधिकारी करतील. त्यांच्या परवानगीगीनंतरच घरात अलगीकरणात राहता येणार आहे. घरात अलगीकरणात राहताना मुखपट्टी वापरम्णे, सामाजिक दूरीचे नियम पाळणे, इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आदी नियम पाळावे लागतील. तशा स्वरूपाचे स्वयंघोषणापत्र द्यवे लागणार आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधिताची संस्थात्मक अलगीकरणात रवानगी केली जाणार आहे, असे या आदेशात म्हटले आहे.

करोनाग्रस्तांच्या डायलिसिससाठी प्रत्येक रुग्णालयात एक खाट आरक्षितकरोनाग्रस्त रुग्णांना डायलिसिससाठी येणारी अडचण लक्षात घेऊन पालिकेने त्यांच्यासाठी खाजगी रुग्णालयात एक खाट आरक्षित करण्याचे आदेश काढले आहे. ज्या खाजगी रुग्णालयात डायलिसिसची सुविधा आहे त्या रुग्णालयातील प्रत्येकी एक खाट ही यापुढे करोनाग्रस्त रुग्णांसाठी आरक्षित ठेवावे असे आदेश पालिका आयुक्त डी. गंगाथरन यांनी काढले आहे. यानुसार अलायन्स रुग्णालय, लाईफ केअर रुग्णालय, विनायक रुग्णालय, के.व्ही.ओ महाजन नवनीत रुग्णालय, विजयालक्ष्मी रुग्णालय वसईचे कार्डीनल ग्रेशस रुग्णालय, प्लॅटिन रुग्णालय, जनसेवा रुग्णालय, वसई किडनी केअर रुग्णालय, आय एम बिल्डकॉन मल्टिसेप्शालिटी रुग्णालय, विरार येथील संजीवनी, एसटी तेरसाज आणि विजय वल्लभ येथे रुग्णांच्या डायलिसीस साठी एक खाट राखिव ठेवण्यात आली आहे.