News Flash

वागळे इस्टेटचा पादचारी उड्डाणपूल फक्त शोभेपुरता

ठाणे शहरातील पादचारी उड्डाणपुलाचा वापर फारच कमी प्रमाणात होत असल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे.

ठाणे शहरातील पादचारी उड्डाणपुलाचा वापर फारच कमी प्रमाणात होत असल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. वा

पादचाऱ्यांकडून अपवादानेच वापर

पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोयीचे जावे, यासाठी ठाणे महापालिकेने वागळे इस्टेट परिसरात उभारलेले स्कॉयवॉय केवळ शोभेचे ठरू लागले असून लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या मार्गिकांचा वापर प्रवाशांकडून अपवादानेच होत असल्याने हा दिखाऊपणा नेमका कशासाठी, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

ठाणे शहरातील पादचारी उड्डाणपुलाचा वापर फारच कमी प्रमाणात होत असल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. वागळे इस्टेट येथील जुन्या पासपोर्ट कार्यालयालगत उभारलेला स्कॉयवॉकची अवस्था फारशी वेगळी नाही. पदपथ नसलेल्या रस्त्यांवर पदपथांची बांधणी, नव्याने बांधलेले पदपथ उखडून तेथे ब्लॉक्स बसवणे, असे उद्योग महापालिकेच्या अभियंता विभागाकडून वर्षभर सुरू आहेत. या कामांवर दर वर्षी कोटय़वधी रुपये खर्च होतात. एवढा मोठा खर्च करून बांधलेले पदपथ पादचाऱ्यांना वापरता येत नसल्याची परिस्थिती शहरातील अनेक भागांत दिसते. एकदा पदपथ तयार झाला की त्यावर लगेचच विक्रेत्यांचे अतिक्रमण सुरू होते.

दरम्यान, गर्दीच्या चौकांमध्ये पादचाऱ्यांना सहजपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी महापालिकेने शहरात काही ठिकाणी पादचारी पूल बांधले आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील जुने पारपत्र कार्यालय येथे चेकनाक्यापासून वागळे इस्टेटकडे येणारा रस्ता, पडवळनगर येथे जाणारा, हजुरी येथे जाणार रस्ता क्र.१६ कडे जाणारा रस्ता असे चार रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी कायम वाहनांची वर्दळ असते. यासाठी महापालिका प्रशासनाने या भागात कोटय़वधी खर्च करून पादचाऱ्यांसाठी अद्ययावत पादचारी पुलाची उभारणी केली. एवढेच नव्हे, तर अपंगासाठी विशेष व्यवस्था आहे.  तरी प्रवासी भरधाव वेगाने येणाऱ्या गाडय़ांची पर्वा न करता रस्ता ओलांडतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 1:40 am

Web Title: wagle estate pedestrian bridge remain unused
Next Stories
1 खाऊखुशाल : चटपटीत चटणी चाट!
2 ‘सॅटिस’वरची हवा धूळमुक्त होणार
3 दिवा कचराभूमीवर पुन्हा धुराचे लोट
Just Now!
X