14 October 2019

News Flash

ठाण्यात गॅलरीची भिंत कोसळली, दुसऱ्या घटनेत हुंडाया कारचे नुकसान

ठाणे पश्चिमेला एका गॅलरीची भिंत दुकानावर कोसळली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. ठाणे पश्चिमेलाच कोलशेत रोडवर तारीचा पाडा येथे पावसे इमारतीजवळ एक झाड

ठाणे पश्चिमेला एका गॅलरीची भिंत दुकानावर कोसळली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. ठाणे पश्चिमेला हाजुरी येथे जामा मशिदीच्या मागच्या बाजूला असलेल्या खेरोला चाळीजवळ ही दुर्घटना घडली. राजू कुरेशी (४५), मोहोम्मद फाजा (३ वर्ष) आणि शाबितुल खान (५०) अशी जखमींची नावे असून त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई आणि ठाणे पट्टयात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबई आणि ठाण्यात जुन्या जर्जर झालेल्या इमारतींचे भाग कोसळल्याच्या काही घटना घडल्या आहेत.

ठाणे पश्चिमेलाच कोलशेत रोडवर तारीचा पाडा येथे पावसे इमारतीजवळ एक झाड कोसळले. या दुर्घटनेत हुंडायाच्या दोन गाडया आणि एका बजाज डिस्कव्हर बाईकचे नुकसान झाले.

First Published on July 17, 2018 2:39 pm

Web Title: wall tree collapse at thane
टॅग Thane,Wall Collapse