20 September 2020

News Flash

कचरा विल्हेवाटीची सक्ती पावसाळ्यानंतर

पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर गृहसंकुलांना पुन्हा मुदतवाढ

( संग्रहीत छायाचित्र )

पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर गृहसंकुलांना पुन्हा मुदतवाढ

दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले तसेच आस्थापनांनी या कचऱ्याची आपल्या आवारातच विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारण्याची ठाणे महापालिकेने आणलेली सक्ती आता पावसाळ्यानंतर अमलात आणली जाणार आहे. कचरा विल्हेवाटीसंदर्भातील आधीची १५ जूनची मुदत महिनाभर लांबणीवर टाकल्यानंतर आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर पावसाळा संपेपर्यंत गृहसंकुलांवर कारवाई न करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेली तसेच दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले आणि आस्थापनांना कचरा विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर गृहसंकुल आणि आस्थापनांना प्रशासनाने नोटिसा पाठवून १५ जूनपासून कचरा उचलणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या निर्णयास गृहसंकुलांनी विरोध केल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. तसेच महापालिका प्रशासनापुढेही मोठा पेच निर्माण झाला होता. या प्रकरणात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. ही मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक राहिले असताना पालकमंत्र्यांनी यात हस्तक्षेप केला. त्यानंतर पावसाळा संपेपर्यंत गृहसंकुलांवर कारवाई न करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

अधिवेशनानंतर बैठक

वाढीव मुदत संपल्यानंतर महापालिकेने कचरा उचलणे बंद केले तर ऐन पावसाळ्यात शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊन रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत होती. या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री शिंदे यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त जयस्वाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. गृहसंकुलांतील नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर गृहसंकुलांचे प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित करून त्यात निर्णय घेण्याची सूचना शिंदे यांनी आयुक्तांना दिल्या.

केंद्र सरकारने आखलेल्या नियमांचे दाखले देण्यात येत असले तरी कचरा विल्हेवाटीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची आर्थिक क्षमता वसाहतींमध्ये आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. याशिवाय हे नियम काय आहेत, त्याची अंमलबजावणी कशी करायची यासंबंधी शहरातील विविध वसाहतींमधील रहिवाशी प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे.    – नरेश म्हस्के, सभागृह नेते ठामपा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 2:10 am

Web Title: waste management 5
Next Stories
1 प्लास्टिकबंदीमुळे रद्दीला ‘भाव’
2 खदानीच्या दलदलीत रुतलेल्या वासराची सुटका
3 वसईत गरोदर महिलेला होडीने रूग्णालयात पोहचवले
Just Now!
X