07 March 2021

News Flash

ठाण्यातील गृहसंकुलात ‘शून्य कचरा’ मोहीम

या गृहसंकुलाला कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.

कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिकेवर अवलंबून राहण्यापेक्षा गृहसंकुलाच्या आवारात त्याची विल्हेवाट लावण्याचा उपक्रम ठाण्यातील फ्लॉवर व्हॉली संकुलाच्या वतीने रविवारी सुरू करण्यात आला. इमारतीमधील सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यात येणार असून गृहसंकुलाच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या कंपोस्ट खत प्रक्रिया केंद्रात टाकण्यात येणार आहे. त्यापासून तयार होणारे खत संकुलाच्या बागेसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या गृहसंकुलाला कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.

ठाणे शहराच्या शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढला असून या नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येऊ लागला आहे. त्यामुळे पाणी आणि कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यास नागरिकांकडून प्रयत्न सुरू होत आहेत. गृहसंकुलातील कचऱ्याचा विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने ठाण्यात प्रयत्न सुरू झाले आहे. त्यातूनच शून्य कचरा मोहीम वाढीस लागली आहे. ठाण्यातील फॉवर व्हॉली या गृहसंकुलाने त्यासाठी पुढाकार घेतला असून संकुलांच्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा विधायक निर्णय घेतला आहे. या संकुलातील रहिवाशांनी हरियाली संस्थेच्या सहकार्याने रविवारी संकुलाच्या आवारामध्ये कंपोस्ट खत तयार करण्यास शुभारंभ केला.

संकुलातील कचरा कसा कमी करता येईल आणि आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर कसा ठेवता येईल, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती फ्लॉवर व्हॅली गुहसंकुलाचे सचिव विनायक कोठारी यांनी दिली. पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन आणि नागरिकांच्या सुदृढ आरोग्याचा व स्वास्थ्याचा विचार करणे येणाऱ्या काळात अत्यंत गरजेचे असल्यामुळे स्वच्छतेची सुरुवात घरांमधील कचऱ्यापासून करण्याचे येथील रहिवाशांनी ठरवले. या पाश्र्वभूमीवर येथील प्रत्येक घरामध्ये सुका व ओला कचरा वेगळा केला जातो. संकुलाच्या आवारामध्ये खतनिर्मितीसाठी हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये येथील रहिवासी जमा झालेल्या ओला कचरा संकलित करतात.

दर पंधरा दिवसांनी यामध्ये खत निर्मित होऊन, त्यामधून उपलब्ध होणाऱ्या खताचा वापर संकुलामधील बागेसाठी करण्याचा निर्णय येथील सभासदांनी घेतला आहे. याबरोबरच या संकुलात पर्जन्य जलसंधारण, सौरऊर्जा उपक्रम आदी पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्यात येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 1:51 am

Web Title: waste management in thane residential
टॅग : Waste Management
Next Stories
1 खाडीला जोडणाऱ्या नाल्यांचे रुंदीकरण करा
2 चंद्रशेखर टिळक यांचे ‘भावतरंग’ उलगडले!
3 यशाचा मार्ग गवसला
Just Now!
X