पाण्यासाठी सर्वच स्तरावर दुष्काळाची परिस्थिती भेडसावत असताना ठाकुर्ली स्थानकात ७२ वर्षीय राजूभाई सिंघानिया प्रवाशांना मोफत पाण्याचे वाटप करत उन्हाळ्यातील जलदूत ठरत आहेत. गेली तीस वर्षे सातत्याने राजूभाई ठाकुर्ली ते सीएसटी या मार्गावरील रेल्वेमध्ये मोफत पाणी पुरवत आहेत. प्रवाशांची तहान भागविणे हे ध्येय त्यांनी उराशी बाळगताना जल सेवा हीच ईश्वर सेवा असा संदेश देऊन प्रवाशांना पाणी पुरविणारे राजूभाई तहान तृप्तीचा आनंद देतात.

illegal construction in green zone near Kopar railway station in Dombivli
डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…
Pune Division , Central Railway, miraj, mega Block , 29 march 2024, Trains Cancelled, Rescheduled,
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द

ठाकुर्लीचा चेहरामोहरा बदलत असताना दुसरीकडे गेली २५-३० वर्षे या स्थानक परिसरात राजूभाईंचे अस्तित्व मात्र अनेकांना जुन्या ठाकुर्लीची आठवण करून देते. दररोज नियमितरीत्या सकाळी ८.५३च्या लोकलने ठाकुर्ली ते सीएसटी स्थानकात दोनशे थंड पाण्याच्या बाटल्या खांद्यावर घेऊन प्रवास करतात. ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत असलेले राजूभाई सकाळी आणि रात्री प्रवासाच्या वेळी पाण्याची सेवा प्रवाशांना पुरवतात.