News Flash

कल्याण, डोंबिवलीच्या तहानेची तरतूद

कल्याण, डोंबिवली शहरांत गेल्या आठ महिन्यांपासून पाणीकपात सुरू आहे. या पाणीकपातीत आणखी भर पडत आहे.

जून महिना उघडल्यानंतरही पावसाची सुवार्ता समजू शकत नसल्याने पाणीटंचाईमुळे कातावलेल्या कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. आणखी काही दिवस पावसाने ओढ दिल्यास शहरातील पाणीटंचाई उग्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेला उल्हास नदीतून १० दशलक्ष लिटर वाढीव पाण्याची उचल करण्यास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीकरांवरील जादा पाणीकपातीचे संकट टळण्याची चिन्हे आहेत.
कल्याण, डोंबिवली शहरांत गेल्या आठ महिन्यांपासून पाणीकपात सुरू आहे. या पाणीकपातीत आणखी भर पडत आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागांत पाण्यासाठी नागरिकांची पळापळ सुरू आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात आठवडय़ाला ६० तास तर शहरी भागात दोन दिवसांची कपात लागू आहे. जून महिना उजाडू लागल्याने पावसाळा अगदीच तोंडावर आला आहे. तरीही पुढील काही दिवस पावसाने ओढ घेतल्याने शहरी भागातील पाणीकपात वाढविण्याशिवाय महापालिकेपुढे पर्याय नाही. हे चित्र लक्षात घेऊन जलसंपदा विभागाकडे ५० दशलक्ष वाढीव पाणी देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु जलसंपदा विभागाने दहा दशलक्ष वाढीव पाणी देण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे पुढील काही दिवस रहिवाशांना काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 3:59 am

Web Title: water irrigation department approved additional water for kalyan dombivali from ulhas river
टॅग : Ulhas River
Next Stories
1 वडोदरा महामार्गाचे सर्वेक्षण बंद पाडले
2 भिवंडी, मुरबाडमध्ये शिधावाटप दुकानदारांवर गुन्हे दाखल
3 कल्याण कचराभूमीला भीषण आग
Just Now!
X