दररोज ३० लाख लिटर पाणी वाया; पाणी गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेची धडपड

लोकसत्ता प्रतिनिधी

विरार : वसई-विरार मध्ये पाणी समस्या तीव्र होत असताना वसई-विरार महापालिकेला पाणी गळतीचा मोठा सामना करावा लागत आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार एकूण पाणी पुरवठय़ाच्या १५ टक्के पाणी हे विविध कारणास्तव वाया जात आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता महानगर पालिका नव्या उपाय योजना आखत आहे. यामुळे भविष्यात पाणी गळती कमी होऊन नागरिकांना मुलाबल प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.

वसई-विरार शहराला दररोज २३१ दशलक्षलीटर पाणी पुरवठा महापालिकेमार्फत केला जातो त्यामध्ये सूर्या धरण टप्पा १ व ३ मधून एकूण २०० दशलक्षलीटर, उसगाव २०,  पेल्हार १० अशा प्रकारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात १५ टक्के पाणी हे विविध कारणास्तव वाया जात आहे. धरणातून  जलशुद्धी केंद्रातून शहरातील विविध संकुलात पाणी पोहोचेपर्यंत होणारी जलवाहिनीतून होणारी विविध करणातून गळती, पाणी चोरी ही प्रमुख कारणे आहेत. तसेच जलशुद्धी केंद्र धुण्यासाठी वापरले जाणारे पाणी, जलवाहिनीत झालेले बिघाड अशी काही कारणे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार महापालिकेची पाणी पुनर्वापर प्रRिया केंद्र नसल्याने हा पाणी वाया जाण्याचे प्रमाण खूप अधिक होते. या संदर्भात माहिती देताना पाणी पुरवठा अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी माहिती दिली की, करोनापूर्वी झालेल्या महासभेत दुकटन येथे पाणी पुनर्वापर प्रRिया केंद्राचा प्रस्थाव पारित करणायत आला आहे. त्यासाठी महापालिका पाच कोटी रुपये खरच करणार आहे. त्याच प्रमाणे शहरातील ज्या जुन्या जलवाहिन्या आहेत त्यांच्या बदलीचे काम सुद्धा लवकरच करण्यात येणार आहे. तसेच इतर नव्या तंत्रप्रणालीचा वापर करत पाणी गालीतीवर पालिका नियंत्रण मिळवणार आहे.   असे असले तरी आता सध्या वसई विरार मध्ये जवळपास दररोज ३० लाख लिटर पाणी वाया जात आहे. याचा फटका मात्र करदात्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना पानी टंचाईचा सामना करावा लागत आहे.