News Flash

नियोजनानंतरही ठाण्यात पाणीटंचाई?

शहराचा पाणीपुरवठा ६० तास बंद ; पालिकेच्या योजनेतून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा

पाणी

शहराचा पाणीपुरवठा ६० तास बंद ; पालिकेच्या योजनेतून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा
ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील उपलब्ध पाणीसाठय़ाच्या नियोजनाच्या दृष्टीने लघू पाटबंधारे विभागाच्या वतीने पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा २४ तास आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा ६० तास बंद करण्यात येणार आहे. स्टेमकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या ठिकाणी महापालिकेच्या पाणी योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार असल्याने ठाणेकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवार, ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार, १० मार्च रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार, ८ मार्च सकाळी ९ पासून रात्रौ ९ पर्यंत शहरातील समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, इटर्निटी या परिसरातील पाणीपुरवठा सुरू राहील.
तर रात्रौ ९ ते सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळवा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा सुरू राहील. बुधवार, ९ मार्च रोजी सकाळी ९ ते गुरुवार, १० मार्च रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत (२४ तास) ठाणे शहरातील या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
यामुळे नागरिकांना जूनपर्यंत तरी पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

शहरात एमआयडीसीचे ६० तासांचे वेळापत्रक कायम
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवार, ९ मार्च रोजी सायंकाळी ६ ते शनिवार, १२ मार्च रोजी सकाळी ६ पर्यंत बंद राहणार असून या कालावधीत कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्र. १ या परिसराचा पाणीपुरवठा (६० तास) बंद राहणार आहे. तसेच या पाणी बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 3:23 am

Web Title: water scarcity in thane 3
Next Stories
1 पाणीटंचाईच्या झळा तीव्र!
2 तरुणाईच्या अभिव्यक्तीला वाट देणारा कवितांचा ‘कॅफे’
3 सावधान, ठाणे पोलीस ‘ऑनलाइन’ आहेत!
Just Now!
X