News Flash

आधीच कपात, त्यात कमी दाब!

ठाणे, कल्याण तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणारे विविध स्रोत उल्हास नदीच्या पात्रातून पाणी उचलतात.

उल्हास नदीच्या पाण्याची पातळी खालावल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा 

जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण तसेच आसपासच्या शहरांचा पाणीपुरवठय़ाचा स्रोत असलेल्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी खालावली असून, यामुळे या शहरांपुढे मोठे पाणी संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत. उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी आतापर्यंत आठवडय़ातून दोनदा पाणीकपात करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता उल्हास नदीतील पाणी पातळी खालावल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ठाणे, कल्याण तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणारे विविध स्रोत उल्हास नदीच्या पात्रातून पाणी उचलतात. गेल्यावर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे उल्हास नदीतील उपलब्ध पाणी साठय़ाचे नियोजन करण्यासाठी यापूर्वीच कपात लागू करण्यात ठाणे, कल्याण तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणारे विविध स्रोत उल्हास नदीच्या पात्रातून पाणी उचलतात.ठाणे, कल्याण तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणारे विविध स्रोत उल्हास नदीच्या पात्रातून पाणी उचलतात.आली आहे. यामुळे या शहरांमध्ये आठवडय़ातून दोनदा पाणी बंद ठेवण्यात येत आहे. तसेच या बंद नंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे सर्वच शहरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले असतानाच आता उल्हास नदीच्या पात्रातील पाणी खालावल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. उन्हाचा कडाका वाढू लागला असून यामुळे नदीतील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊ लागले आहे. यामुळे नदीतील पाण्याची पातळी खालावत आहे. नदीतील पातळी खालावल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असून यामुळे येत्या दोन महिन्यात ही समस्या भेडसावण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

कल्याण डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा दोन दिवस, एमआयडीसीचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद असतो. त्यात पुढील दोन ते तीन दिवस पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने शहरात अभूतपूर्व अशी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बारवी धरणात फक्त ५० टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यात दोन महिने कडक उन्हात बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी आणखी कमी होणार आहे. त्यामुळे पाणी उपशावर आणखी र्निबध येण्याची शक्यता अधिकारी वर्तवीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2016 2:23 am

Web Title: water shortage in ulhas river thane
टॅग : Thane,Ulhas River
Next Stories
1 उथळसर बाजारपेठेत सुविधांचा खडखडाट!
2 भोंगेबहाद्दरांना चाप!
3 जलपर्णी काढण्यात कडोंमपा हतबल
Just Now!
X