News Flash

ठाणे जिल्ह्यातील शहरांचा पाणीपुरवठा सुरळीत

चोवीस तासानंतर जिल्ह्यातील शहरांचा पाणी पुरवठा सुरु केला आहे.

ठाणे : कल्याण-शीळ मार्गावरील काटई येथे फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सायंकाळी पुर्ण करत एमआयडीसीने चोवीस तासानंतर जिल्ह्यातील शहरांचा पाणी पुरवठा सुरु केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांना पाणी पुरवठा करणारी १७१२ मि.मी. व्यासाची ‘एमआयडीसी’ची जलवाहिनी कल्याण-शीळ मार्गावरील काटईजवळ शुक्रवारी सायंकाळी फुटली.

यामुळे ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. ठाणे शहरातील वागळे इस्टेटचा काही भाग, कळवा, मुंब्रा, दिवा तर, कल्याण-डोंबिवलीमधील एमआयडीसी, २७ गावे आणि शहाड भागाचा पाणीपुरवठा बंद होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 1:53 am

Web Title: water supply to cities in thane district is smooth akp 94
Next Stories
1 बनावट ओळखपत्राद्वारे अभिनेत्री मीरा चोप्राचे लसीकरण 
2 अर्ध्या ठाणे जिल्ह्यावर पाणीसंकट
3 जिल्ह्य़ाच्या पदरी निराशाच!
Just Now!
X