कल्याण-डोंबिवली पालिकेतील विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी रविवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमधून शिवसेनेते प्रवेश केला.
राणे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. परंतु, पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेले आठ महिने राणे हे शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होते. विरोधी पक्षनेता म्हणून सभागृहातील सत्ताधारी शिवसेना-भाजपबद्दल त्यांनी मवाळ धोरण स्वीकारले होते. त्यामुळे राणे हे पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेत जाणार हे निश्चित झाले होते.