18 February 2020

News Flash

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर बडगा

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या एप्रिल ते डिसेंबर महिन्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली होती.

पश्चिम रेल्वेची २१ लाख प्रवाशांवर कारवाई; १०४.३३ कोटी रुपयांची दंडवसुली

 

विरार : उपनगरी रेल्वे प्रवासात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करत पश्चिम रेल्वेने नऊ महिन्यांत १०४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. या प्रकरणी २१ लाख ३३ हजार प्रवाशांवर कारवाई केली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. यात फेरीवाले, भिक्षेकरी आणि आणि सामानाचे तिकीट न घेता प्रवास करणाऱ्यांचाही समावेश आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या एप्रिल ते डिसेंबर महिन्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत दंड स्वरुपात वसूल केलेली रक्कम २०१८च्या तुलनेत ८.८५ टक्के जास्त आहे. यामुळे यावर्षी अधिक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे.

ही कारवाई पश्चिम रेल्वेच्या सर्व क्षेत्रात करण्यात आली. या कारवाईत २,२१९ भिक्षेकरी तसेच ४,७११ फेरीवाले यांचाही समावेश आहे. त्यांना रेल्वे स्थानकाच्या परिसरातून हाकलून त्यांच्याकडून दंडवसुली करण्यात आली, तर १,१३४ प्रवाशांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवले आहे. केवळ डिसेंबर महिन्यात विनातिकीट आणि अयोग्य तिकिटावर प्रवास करणाऱ्या २ लाख १३ हजार प्रवाशांकडून १० कोटी १४ लाख रुपये दंडवसुली केली आहे. १५१ भिक्षेकरी आणि ५९३ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. ११५ जणांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते डिसेंबर २०१९ च्या दरम्यान पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून दलाल आणि बेकायदा तिकिटांचा व्यवहार करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी २१२४ इतक्या मोहीम हाती घेतल्या होत्या त्यात १८२१ व्यक्तींना पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली, तर सुरक्षा बलाकडून १६३२ भिक्षेकऱ्यांची रेल्वे स्थानकातून हकालपट्टी केली.

२१,३३,००० प्रवाशांवर कारवाई

२१२४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाईसाठी

मोहिमा १०४ कोटी रुपयांची

दंडवसुली

पश्चिम रेल्वेने नऊ महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या २१ लाख ३३ हजार प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १०४.३३ कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.

– रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

First Published on January 23, 2020 1:22 am

Web Title: without ticket traveller western railway action akp 94
Next Stories
1 रेल्वे पोलीस सुविधांपासून वंचित
2 व्यवसायाच्या नावाखाली ३५ लाखांचा गंडा
3 ऑनलाइन पक्षी खरेदीत फसवणूक
Just Now!
X