01 October 2020

News Flash

मुलीची हत्या करून महिलेची आत्महत्या

श्रुतीचा खून का केला आणि आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

(सांकेतिक छायाचित्र)

ठाणे : कळवा येथील मनीषानगर परिसरात एका महिलेने आपल्या १८ वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.

प्रशांत पारकर हे कळवा येथील मनीषानगर भागात राहतात. पत्नी प्रज्ञा आणि मुलगी श्रुती असा त्यांचा परिवार. शुक्रवारी सकाळी प्रशांत हे नेहमीप्रमाणे व्यायामशाळेत गेले. त्या वेळेस प्रज्ञा आणि श्रुती या दोघीच घरी होत्या. प्रज्ञा हिने श्रुतीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशांत हे व्यायामशाळेतून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत त्यांनी माहिती दिल्यानंतर कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रज्ञा हिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना घरामध्ये सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये तिने श्रुतीच्या हत्येची कबुली दिली आहे. तसेच आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असे चिठ्ठीत नमूद करण्यात आल्याचे कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले. तिने श्रुतीचा खून का केला आणि आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 1:10 am

Web Title: woman commits suicide after killing daughter zws 70
Next Stories
1 मुंबईचा राडारोडा ठाण्यात!
2 भाऊरायाच्या ‘करिअर’ला साजेशी राखी!
3 फुगीर अर्थसंकल्पामुळे प्रकल्पांची रखडपट्टी
Just Now!
X