26 September 2020

News Flash

ठाण्यात टॅक्सी उलटून महिलेचा मृत्यू

ठाणे येथील माजिवाडा उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी टॅक्सी उलटून झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला

ठाणे येथील माजिवाडा उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी टॅक्सी उलटून झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिघे किरकोळ जखमी झाले.
हमिदा मोमीन (६०) असे या महिलेचे नाव असून त्या भिवंडीतील शांतीनगर भागात राहत होत्या. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तसेच त्यांच्या पायाला जखम झाली होती. यामुळे मुंबईतील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यासाठी त्यांना आठवडय़ातून एकदा रुग्णालयात जावे लागत होते. त्यांचा नातेवाईक सय्यद बसर (४५) हा टॅक्सीचालक असून तो त्यांना नियमित रुग्णालयात घेऊन जायचा. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी तो त्यांना टॅक्सीने रुग्णालयात घेऊन गेला आणि उपचारानंतर दुपारी त्यांना घरी घेऊन येत होता. त्या वेळी टॅक्सीमध्ये हमिदा यांचा मुलगा शाहनवाज (२६) आणि मुलगी नबीला (२०) हे दोघे होते. माजिवाडा उड्डाणपुलाच्या वळणावर सय्यदचा ताबा सुटल्यामुळे टॅक्सी उलटली. त्यात हमिदा यांचा मृत्यू झाला तर सय्यद, शाहनवाज, नबीला हे जखमी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 12:06 am

Web Title: woman killed in road accident
Next Stories
1 छातीत दुखू लागल्याने गायक आनंद शिंदे रूग्णालयात दाखल
2 डोंबिवलीतील स्फोट बॉयलरमुळे नाही; अग्निशामन दलाची माहिती
3 डोंबिवली अद्याप सुन्न..
Just Now!
X