News Flash

बदलापूरमध्ये लोकलखाली महिलेचा मृत्यू

बदलापूर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना शनिवारी दुपारी एका महिलेचा मृत्यू झाला.

बदलापूर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडताना शनिवारी दुपारी एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
बदलापूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवरून दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल गाडीखाली चिरडून या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचे वय अंदाजे ५० वर्षे आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरात रुळाजवळच्या वाटा बंद केल्या होत्या. मात्र, भाजपच्या स्थानिक नगरसेवकाने याबाबत आक्षेप नोंदवला होता. गेल्याच आठवडय़ात अज्ञातांनी या वाटा पुन्हा मोकळ्या केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2016 2:14 am

Web Title: woman killed in train accident
Next Stories
1 परवडणाऱ्या घरांची योजना अडचणीत?
2 ‘कडोंमपा’तील झोपडपट्टी घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर गुन्हे
3 ठाण्यात काँग्रेस तोंडघशी
Just Now!
X