News Flash

प्रवाशांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

पुष्पक एक्स्प्रेसमधून एक महिला घसरून पडल्याने जबर जखमी झाली.

कल्याण रेल्वे स्थानकातून सुटलेल्या पुष्पक एक्स्प्रेसमधून एक महिला घसरून पडल्याने जबर जखमी झाली. मंगळवारी सकाळी साडेऊनच्या सुमारास पत्री पुलाजवळ ही घटना घडली. गीता जोधीया (४०) असे या महिलेचे नाव असून ती जुईनगर येथे राहते. गाडीतून पडल्याने जखमी झालेल्या गीता यांना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाडीतल्या प्रवाशांनी पाहिले व उचलून डोंबिवली स्थानकातील रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या महिलेला उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला व चेहऱ्याला जबर मार लागला असल्याने तिला शीव रुग्णालयात दाखल केले आहे.

पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवास करणारी गीता ही  एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये भीक मागून गुजराण करते. कल्याण पत्रीपुलाजवळ एक्स्प्रेसचा वेग कमी होत असल्याने चालत्या गाडीतून खाली उतरून पुन्हा कल्याण स्थानकाकडे चालत जाण्याचा त्यांचा दिनक्रम होता. मंगळवारी मात्र खाली उतरताना चक्कर आल्याने ती खाली पडली. त्यात तिच्या डोक्याला मार लागला. त्याचवेळी बाजूने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाडीतील प्रवाशांनी हा प्रकार पाहिला व गाडी थांबवली. त्यानंतर काही प्रवाशांनी उतरून या महिलेला गाडीत चढवले व डोंबिवली रेल्वे स्थानकातील पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे गीताचा जीव वाचला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2016 1:22 am

Web Title: woman life saved due to alertness of passengers
टॅग : Life,Woman
Next Stories
1 निवृत्तीवेतनासाठी ज्येष्ठांची परवड
2 बेकायदा नळजोडणी करणाऱ्या प्लंबरवर कारवाई
3 ‘शिवसेना नगरसेवकाकडून जिवाला धोका’
Just Now!
X