21 October 2020

News Flash

चारित्र्याच्या संशयावरून महिलेची हत्या

भिवंडी येथील घटना; शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधिक छायाचित्र

भिवंडी येथील घटना; शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : भिवंडी येथील गायत्रीनगर भागात चारित्र्याच्या संशयावरुन एका महिलेची हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली. लक्ष्मी भारती असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

गायत्रीनगर येथील दुसरी बावडी परिसरात लक्ष्मी भारती (३५) राहत होती.  तिचा पती रामरतन हा  हा वारंवार लक्ष्मीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. तसेच तिला घर खर्चासाठी पैसे देत नसे. या कारणांवरून त्यांच्यामध्ये दररोज खटके उडत होते. सोमवारी सकाळीही त्यांच्यामध्ये याच कारणांवरून वाद झाले. या वादातून रामरतन याने घरातील लोखंडी वस्तूने  पत्नीला मारहाण केली. यात पत्नी लक्ष्मी हिच्या चेहऱ्यावर, हातावर गंभीर जखमा झाल्या होत्या. यानंतर रामरतन घटनास्थळावरून फरार झाला होता.

लक्ष्मी भारती हिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  दरम्यान, रामरतन हा उत्तरप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून रामरतन याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता  गुन्ह्यची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी रामरतन याला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 1:09 am

Web Title: woman murder in bhiwandi over suspicion of character zws 70
Next Stories
1 पतीच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या
2 बेकायदा बांधकामे तातडीने पाडा
3 वसईच्या खाडीपात्रात जेलिफिशचा शिरकाव
Just Now!
X