ठाणे : घोडबंदर येथील ओवळा परिसरात २६ वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख ९५ हजार रुपये लुटून नेल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ओवळा येथील श्रीराम रुग्णालयाजवळ ही महिला राहते. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्या शेतातील घरात गेल्या असता दोन चोरटे त्या ठिकाणी आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवला. तसेच महिलेच्या गळ्यातील एक लाख ७० हजार रुपयांचे दागिने आणि २५ हजार रुपयांची रोकड चोरटय़ांनी तिच्याकडून जबरीने हिसकावले. त्यानंतर चोरटय़ांनी पळ काढला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2020 12:05 am